Manoj Jarang News : हेलिकॉप्टर, 201 जेसीबींमधून जरांगेंवर पुष्पवृष्टी होणार!

Maratha Reservation Rally : बीडच्या सभेला तुफान प्रतिसाद; सरकारला काय देणार इशारा?
Manoj Jarang Maratha Reservation Rally
Manoj Jarang Maratha Reservation Rally sarkarnama
Published on
Updated on

Beed : मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारला आरक्षणासाठी दिलेल्या इशारा संपण्यासाठी अवघ्या 24 तासांचा वेळ राहिला आहे. त्यामुळे आज (23 डिसेंबर) बीडमध्ये जरांगे-पाटील यांच्या सभेला तुफान गर्दी झाली आहे. जरांगे यांनी सभेपूर्वी काढलेल्या रॅलीला देखील मोठा प्रतिसाद मिळला आहे. रॅलीनंतर जरांगेंवर तब्बल 201 जेसीबी तसेच हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी होणार आहे.

Manoj Jarang Maratha Reservation Rally
Maratha Reservation : मराठा आरक्षण 24 डिसेंबरपर्यंत देणे अशक्य; भाजप आमदाराचे मोठे विधान

मनोज जरांगे पाटील ( Manoj Jarang) यांनी अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र व आरक्षण मिळावे, यासाठी दोन वेळा उपोषण केले होते. दुसऱ्यांदा केलेल्या उपोषणानंतर सरकारने मागितलेली मुदत 24 डिसेंबरला संपत आहे. त्यामुळे आता जरांगे-पाटील काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'सगेसोयरे' शब्दावरून सरकार आणि जरांगे-पाटील यांच्यामध्ये एकमत होण्यास तयार नाही. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम आहेत. आता, बीडच्या सभेला 'निर्णायक इशारा सभा' नाव देण्यात आले आहे. सभेची संयोजकांनी जय्यत तयारी केली आहे. शंभर एकरांवर तयार केलेल्या मैदानाला 'पाटील मैदान' असे नामकरण करण्यात आले आहे. सभेसाठी मनोज जरांगे-पाटील शुक्रवारी रात्रीच जिल्ह्यात दाखल झाले होते.

Manoj Jarang Maratha Reservation Rally
Marathwada Politics News : भाजप शहराध्यक्षाच्या मुलीच्या लग्नात नेत्यांचे `हम साथ साथ है`...

सभेची मागच्या 10 दिवसांपासून जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे. शहरात सर्वत्र कमानी, बॅनर व भगवे झेंडे लागले आहेत. दरम्यान, सभेच्या अनुषंगाने जरांगे-पाटील यांच्या शहरातून रॅलीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन सुरुवात झाली आहे. त्यानंतर सुभाष रोडवर आलेल्या रॅलीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळ्याला अभिवादन केले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.

सभेवेळी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर हेलिकॉप्टरसह 201 जेसीबींमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. सभेत जरांगे-पाटील आता कोणती निर्णायक भूमिका मांडणार, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited By Roshan More)

Manoj Jarang Maratha Reservation Rally
Pune Police: धक्कादायक: पुण्यात निवृत्त पोलिस अधिकाऱ्याला दगडाने ठेचण्याचा प्रयत्न; प्रकृती चिंताजनक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com