Unmesh Patil News: भाजपचं टेन्शन वाढलं! एकनाथ शिंदेंचे उमेश पाटलांना बळ; जळगावात राजकीय गणितं बदलणार?

Jalgaon Politics News Unmesh Patil Shiv Sena Entry: माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नव्या राजकीय खेळीमुळे जळगावच्या राजकारणात नवे समिकरणं तयार होणार आहेत.
Jalgaon Politics News Unmesh Patil Shiv Sena Entry:
Jalgaon Politics News Unmesh Patil Shiv Sena Entry:Sarkarnama
Published on
Updated on

Unmesh Patil News: जळगावचे माजी खासदार उमेश पाटील यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 'जय महाराष्ट्र' केला. त्यांच्या पक्षप्रवेश उद्धव ठाकरे पेक्षा भाजपला अधिक अस्वस्थ करणारा ठरत आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार उन्मेश पाटील यांनी मोठा निर्णय घेतला. विरोधी पक्षात राहून भाजपला आव्हान देणारे नेते म्हणून जळगावकर त्यांच्याकडे पाहत होते. आता ते सत्ताधारी महायुतीचा भाग बनले आहेत.

Jalgaon Politics News Unmesh Patil Shiv Sena Entry:
Maharashtra Police: जिथं भांडी घासली तिथंच खाकी वर्दीत सत्कार झाला! वेटर ते PSI: संग्राम मळकर यांची संघर्षगाथा तुम्हाला माहीत आहे का?

उन्मेश पाटील यांना लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारले. त्यामागे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे राजकीय डावपेच होते. कोणालाही प्रस्थापित होऊ द्यायचे नाही हा त्यांचा हेतू त्यातून लपून राहिला नव्हता.

जळगावच्या राजकारणावर गिरीश महाजन यांना विरोध करणाऱ्या प्रत्येकाला असेच कोंडीत पकडले गेल्याचा इतिहास आहे. एकनाथ खडसे हे त्यापैकीच एक. उमेश पाटील यांनी सत्ताधारी महायुतीचा घटक होऊन भाजपला चेकमेट करण्याचा प्रयत्न केला आहे.

उमेश पाटील यांना २०१४ मध्ये विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. आमदार म्हणून त्यांची कामगिरी लक्षणीय कामगिरी होती. त्यानंतर २०१९ मध्ये माजी खासदार जे.टी.महाजन यांची उमेदवारी कापून अनपेक्षितपणे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले होते.

हाच प्रयोग भाजप नेत्यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केला. विद्यमान खासदार असताना पाटील यांची उमेदवारी स्मिता वाघ यांना देण्यात आली. सतत पत्ते पिसण्याचे मंत्री महाजन यांचे राजकारण तेव्हा अनेकांना पसंत पडले नव्हते.

Jalgaon Politics News Unmesh Patil Shiv Sena Entry:
NCP Leader Arrested: राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक; तरुणीवर लैंगिक अत्याचार, पक्ष कारवाई करणार का?

त्यातूनच पाटील यांनी उद्धव ठाकरे पक्षात प्रवेश करील चाळीसगाव विधानसभा निवडणुकीत आपली सोय करून घेतली होती. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांनी शेतकरी आंदोलन उभारून भाजपला त्रस्त केले होते.

आता त्यांनी राजकारणाची हवा आणि सत्ताधारी पक्षाचा विरोधकांना कोंडीत पकडण्याचा डाव वेळेत ओळखला. एकनाथ खडसे यांच्या मागे खटल्यांचा ससेमीरा सूचक आहे. त्यातून कदाचित पाटील महायुतीचे घटक झाले असावे.

Jalgaon Politics News Unmesh Patil Shiv Sena Entry:
UPSC Success Story: बाप शेतकरी, पोरगं झालं ‘क्लास वन’ अधिकारी! शिकवणी न लावता असं केलं अभ्यासाचं नियोजन

उन्मेश पाटील यांचा शिवसेना प्रवेश होताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ते जळगावचे भावी खासदार आहेत, असे सूचक विधान केले. या प्रवेशाच्या तोंडावरच आमदार मंगेश चव्हाण यांनी सोशल मीडियावरील ऑडिओ क्लिप व्हायरल करून, आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केली. त्यामुळेच उन्मेश पाटील सत्ताधारी गटात आल्याने भाजपची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच भाजपला हे आव्हान कसे बोलायचे याची चिंता सत्तावू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com