Supreme Court Hearing on Shivsena Symbol News
Supreme Court Hearing on Shivsena Symbol NewsSarkarnama

Election Commission News : निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देईल? कायदेतज्ज्ञ म्हणतात...

Shivsena News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे.
Published on

Central Election Commission News : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsen) पक्ष आणि पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिले आहे. दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रेचा खटला प्रलंबित असताना निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालामुळे मोठा घटनात्मक पेच निर्माण झाला, असल्याचे घटनातज्ज्ञ सांगतात.

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिंदे गटाकडून जारी केलेला व्हीप ठाकरे गटातील आमदार पाळणार का? किंवा ठाकरे गटातील आमदारांनी शिंदे गटाचा व्हीप पाळला नाही, तर मग त्यांच्यावर काही कारवाई होईल का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी आपले मत मांडले आहे.

Supreme Court Hearing on Shivsena Symbol News
Shivsena News : शिवसेनेची कार्यकारणी लोकशाहीला धरून झाली का? अरविंद सावंतांनी थेट पुरावाच दिला

माध्यमांशी संवाद साधताना निकम म्हणाले की, कायद्याचा मोठा गुंता झाला आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्यात येतील. त्याबाबत न्यायालय काय निर्णय देईल? हे सांगणे आज कठीण आहे. मात्र, माझ्या मते या प्रकरणात कायद्याचे अनेक मुद्दे उपस्थित झाले आहेत.

Supreme Court Hearing on Shivsena Symbol News
Shivsena : सत्ता गेली, पक्षाचे नाव अन् चिन्हही ; मग ठाकरेंच्या सैनिकांची एकजूट कायम राहील ?

त्यामुळे न्यायालयातील सुनावणी पूर्ण होईपर्यंत, केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे, त्याला न्यायालय स्थगिती देईल का? हे बघितले पाहिजे, असे निकम यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com