Tanaji Sawant News : 'अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्या'नंतर सावंतांवर पुन्हा 'टेंडर'वरून आरोप; निलंबित अधिकाऱ्याचं थेट CM ना पत्र

Bhagwan Pawar : आरोग्यमंत्र्यांसह विभागातील वरिष्ठांची मर्जी डावलल्यानं भगवान पवार यांना महिला सहकाऱ्यांचे लैंगिक शोषण, महिला सहकाऱ्यांना मानसिक देणे, कामात अनियमितता असल्याचा ठपका त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.
tanaji sawant eknath shinde bhagwan pawar
tanaji sawant eknath shinde bhagwan pawarsarkarnaa

Pune News, 26 May : राज्यात शिंदे सरकार येताच आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची 'मर्जी' सांभाळात पुणे महापालिकेत आरोग्य प्रमुखपदावर डॉ. भगवान पवार यांची नियुक्ती झाली होती. पण, या पदावर येण्यापूर्वी डॉ. पवार यांनी केलेल्या कारमान्यांची दखल घेत शिंदे सरकारनेच त्यांचं निलंबन केलं होतं. निलंबनानंतर डॉ. पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांना पत्र लिहित मंत्री तानाजी सावंत यांचा उल्लेख न करता गंभीर आरोप केले आहेत.

"मंत्र्यांनी मला पुण्यात असलेल्या कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलवून नियमबाह्य टेंडर, खरेदी प्रक्रिया आणि अन्य कामांत मदत करण्याबाबत दबाब आणला होता. पण, नियमबाह्य कामात मदत केली नाही म्हणून माझे निलंबन करण्यात आले," असं म्हणत डॉ. पवार ( Bhagwan Pawar ) यांनी अप्रत्यक्षपणे तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. 'अ‍ॅम्ब्युलन्स घोटाळ्या'नंतर डॉ. पवार यांनी 'टेंडर'वरून केलेल्या आरोपांमुळे तानाजी सावंत पुन्हा चर्चेत आले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलं?

आदरणीय महोदय, मी सार्वजनिक आरोग्य विभागातील जेष्ठतम अधिकारी असून माझी एकूण सेवा ३० वर्ष झालेली असून जिल्हा आरोग्य अधिकारी, पुणे व सातारा येथे एकूण 13 वर्षे उत्कृष्ठ कामकाज केलेले आहे. माझे गत 5 वर्षातील गोपनिय अभिलेख अत्युत्कृष्ठ (10/10) असून वरीष्ठ अधिकारी यांची कामाबाबत कोणतीही तक्रार नाही. कोवीड-19 च्या साथ उद्रेकामध्ये मी पुणे जिल्ह्यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून उत्कृष्ठ सेवा बजावलेली आहे. विविध कामकाजाबाबत माझा आयुक्त, आरोग्य सेवा, मुंबई, विभागीय आयुक्त, पुणे, जिल्हाधिकारी व पालकमंत्री महोदय (पुणे/सातारा) यांचेमार्फत वेळोवेळी सत्कार केलेला आहे.

सद्यास्थितीत मी आरोग्य अधिकारी (आरोग्य प्रमुख), पुणे महानगरपालिका येथे दि.13/03/2023 पासून कार्यरत होतो, सदरहू ठिकाणी माझ्या कामकाजाबाबत कोणत्याही गंभीर तक्रारी नाहीत अथवा प्रशासकीय चौकशी झालेली नाही तसेच आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचे माझ्या कामकाजाबाबत प्रतिकुल शेरे नाहीत. तरीही शासनामार्फत उपरोक्त संदर्भान्वये माझ्या निलंबनाचे आदेश प्राप्त झालेले आहेत व हे मला आज (14.28/4) / 2028 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता मिळाले.

माझे कामकाज व सर्व्हिस रेकॉर्ड उत्तम असताना केवळ मागासवर्गीय अधिकारी म्हणून व हेतुपुरस्सरपणे त्रास देण्याच्या हेतूने प्रेरीत होवून माझे निलंबन करण्यात आलेले आहे. मा. मंत्री महोदय यांनी मला पुणे स्थित कात्रज येथील कार्यालयात वारंवार बोलावून नियमबाह्य टेंडरची कामे, खरेदी प्रक्रियेची कामे व इतर कामामध्ये मदत करणेस दबाव आणला होता. परंतु, मी नियम बाह्य कामात मदत केली नाही व इतर नियमबाह्य कामे केली नाहीत, म्हणून माझे निलंबन करण्यात आलेले आहे. मी मॅटमध्ये दावा दाखल केला हा आकस मनामध्ये ठेवून माझी मानसिक छळवणूक सुरु केली होती. आरोग्य अधिकारी (प्रमुख), महानगरपालिका पुणे हे पद रिक्त करण्याकामी माझ्या विरुध्दच्या तथ्य नसलेल्या जुन्या तक्रारीच्या अनुषंगाने 29-04-2024 रोजी चौकशी समिती स्थापन करुन चौकशी न करताच घाई गडबडीत त्यांना अपेक्षित तो अहवाल प्राप्त करुन संदर्भ क्र.1 च्या आदेशान्वये मला निलंबित करणेत आलेले आहे.

tanaji sawant eknath shinde bhagwan pawar
Tanaji Sawant : फडणवीसांना जाहीर सभेत दिलेला शब्द तानाजी सावंत कसा पूर्ण करणार?

सबब माझे निलबंन हे माझ्या विरुध्द तक्रारीमध्ये तथ्य नसतांनाही हेतुपुरस्सरपणे त्रास देण्याच्या हेतूने व माझे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी मा. मंत्री महोदय यांच्या दबावामुळे केलेले आहे, अशी माझी धारणा आहे. झालेल्या निलंबनामुळे माझे मनोधैर्य खचुन गेले असून माझे कुटुंब मानसिक तणावामध्ये आहे. निलंबन करित असताना, माझ्या सध्याच्या कार्यकालातील तक्रारी नसताना केवळ जुन्या तक्रारी शोधून काढून आणि माझे म्हणने सादर करणेची कोणतीही संधी न देता माझे निलबंन करुन माझ्यावर अन्याय झालेला आहे, असं डॉ पवार यांनी पत्रात म्हटलं आहे.

tanaji sawant eknath shinde bhagwan pawar
Tanaji Sawant : फडणवीसांना जाहीर सभेत दिलेला शब्द तानाजी सावंत कसा पूर्ण करणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com