ajit pawar tanaji sawant
ajit pawar tanaji sawantsarkarnama

Tanaji Sawant News : "शिवसेनेचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला, तर...", सावंतांचं अजितदादांसमोरच रौद्ररूप

Dharashiv Lok Sabha Constituency : राष्ट्रवादीच्या ( अजित पवार गट ) उमेदवार अर्चना पाटील यांनी धाराशिव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
Published on

धाराशिव लोकसभा मतदारसंघावरून ( Dharashiv lok Sabha Constituency ) शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. येथून मंत्री तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) यांचे पुतणे शिवसेनेकडून ( शिंदे गट ) तर, भाजपकडून आमदार राणाजगजितसिंह पाटील इच्छुक होते. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं बाजी मारत राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. पण, धाराशिव, परभणी, रत्नागिरीसारखे शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघ महायुतीतील मित्रपक्षांना गेल्यानं तानाजी सावंत अजित पवारांसमोरच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं.

राष्ट्रवादीच्या ( अजित पवार गट ) उमेदवार अर्चना पाटील यांनी धाराशिव मतदारसंघातून उमेदवारी अर्ज आज ( शुक्रवार, 19 एप्रिल ) दाखल केला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ), आमदार संजय बनसोडे, आमदार राणाजगजितसिंह पाटील, मंत्री तानाजी सावंत ( Tanaji Sawant ) उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तानाजी सावंत म्हणाले, "महायुतीचा उमेदवार कोणीही असेना, पण धनंजय सावंत यांनी 26 जानेवारीपासून प्रचाराला सुरुवात केली होती. धाराशिव हा मतदारसंघ पारंपरिक पद्धतीनं कडवट शिवसैनिकांचा आहे. तो कडवट बाणा शिवसैनिक कधीही सोडणार नाही. तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तीन नेत्यांनी हा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय घेतला."

ajit pawar tanaji sawant
Tanaji Sawant News: पक्षशिस्तीची ऐसी-तैसी करत शिंदे गटाच्या प्रवक्त्याचा पोरकटपणा; विरोधकांना गुदगुल्या

"पुढील सभेत विरोधकांचा फडशा पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. पण, अशाच पद्धतीनं शिवसैनिकांचा एक-एक मतदारसंघ कमी होत राहिला, तर हा शिवसैनिक आणि मी स्वत: हा कधीही सहन करणार नाही. कारण, पारंपरिक शिवसेनेचा मतदारसंघ आहे. या ठिकाणाहून आठ वेळा शिवसेनेचा खासदार निवडून गेला आहे. हा तमाम शिवसैनिकांवर अन्याय आहे. पण, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आपलं दु:ख विसरून राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या पुढं जात अर्चना पाटलांना लीड द्यायचं आहे," असं आवाहन तानाजी सावंतांनी केलं.

R

ajit pawar tanaji sawant
Ajit Pawar News : विरोधक अन् मित्र कसा असावा, हे शिवतारेंकडून शिका! अजितदादांकडून कौतुकाचा वर्षाव...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com