High Court News : उच्च न्यायालयाचा दणका ; 'त्या' 25 अनधिकृत होर्डिंगवरील स्थगिती उठवली; कारवाईचा मार्ग मोकळा

Pune News : पुणे शहरात एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या सुनावणीमध्ये सूर्या पब्लिसिटीने २५ होर्डिंग नियमित करून देण्याबाबत न्यायालयाकडे विनंती केली होती.
Mumbai High court News
Mumbai High court NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune : पुणे महापालिकेच्या हद्दीत सूर्या पब्लिसिटी या व्यावसायिकाने हडपसर, वानवडी, ढोले पाटील रस्ता, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत २५ अनधिकृत होर्डिंग उभारले होते. त्यावर महापालिकेने कारवाई करू नये यासाठी सूर्या पब्लिसिटीने उच्च न्यायालयात २०१५ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यानुसार कारवाईवर २०१५ पासून स्थगितीचे आदेश दिले होते. पण आता पुणे शहरात अनधिकृतपणे होर्डिंग उभारून त्याचे शुल्कही न भरणाऱ्या कंपनीला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे.

पुणे शहरात एप्रिल २०२३ मध्ये झालेल्या सुनावणीमध्ये सूर्या पब्लिसिटीने २५ होर्डिंग नियमित करून देण्याबाबत न्यायालयाकडे विनंती केली होती. ही विनंती मान्य करून न्यायालयाने शुल्क भरून घेऊन हे होर्डिंग नियमित करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आकाश चिन्ह विभागाने दोन वेळा नोटीस पाठवून जाहिरात शुल्क भरण्यास सांगितले होते. पण हे शुल्क भरता होर्डिंगचा अनधिकृतपणे वापर सुरू ठेवला होता.(High Court)

Mumbai High court News
Pimpri-Chinchwad : विद्या चव्हाणांनी हकालपट्टी केलेल्या कविता आल्हाटांना रूपाली चाकणकरांनी 24 तासातच पदावर बसवले

महापालिकेच्या वकिलांनी सात जुलै रोजी झालेल्या सुनावणीमध्ये सूर्या पब्लिसिटी यांनी शुल्क थकविले असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने सूर्या पब्लिसिटीच्या २५ होर्डिंगवरील स्थगिती उठवली आहे. त्यामुळे आता हे अनधिकृत होर्डिंगवर काढून टाकण्यासाठीची प्रलंबित शुल्क वसूल करण्याची कारवाई केली जाणार आहे असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Latest Marathi News)

Mumbai High court News
Ajit Pawar & Abdul Sattar News : अजित पवारांनीच अब्दुल सत्तारांना एका झटक्यात माजी कृषिमंत्री करून टाकले

याविषयी महापालिकेच्या विधी सल्लागार निशा चव्हाण म्हणाल्या, सूर्या पब्लिसिटीच्या २५ अनधिकृत होर्डिंग(Hoarding)वरील खटल्यात महापालिकेच्या वकिलांनी योग्य पद्धतीने बाजू मांडून स्थगिती उठवली आहे. त्यामुळे या होर्डींगवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला असल्याचंही चव्हाण यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com