Pune News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाकडून केली जात आहे. यावेळेस कोथरूड मतदारसंघात हायव्होल्टेज लढत होत आहे. याठिकाणी महायुती, महाविकास आघाडीसोबतच मनसेचा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरलेला आहे. त्यामुळे याठिकाणी तिरंगी लढत होत असल्याने जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळणार असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोथरूडकर सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध असणारे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे (Chandrakant Mokate) यांनी महाविकास आघाडीतील सर्व नेते, पदाधिकारी व कोथरूडकरांसमवेत पायी चालत जाऊन मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
छत्रपती श्री शिवाजी महाराज तसेच महर्षी केशव धोंडीबा कर्वे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. ठिकठिकाणी या पदयात्रेचे नागरिकांनी व पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक चौकात महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्षांच्या नेत्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत चंदकांत मोकाटे यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प केला.
या वेळी शिवसेना (Shivsena) पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहिर, वंदना चव्हाण, अंकुश काकडे, अभय छाजेड, विकास पासलकर, लक्ष्मी दुधाणे, स्वाती पोकळे, चंदू कदम, प्रशांत बधे, दामोदर कुंबरे, शिवा मंत्री, योगेश मोकाटे, तानाजी निम्हण, गजानन थरकुडे, संजय मोरे, डॉ. अभिजित मोरे, गोपाळ तिवारी, राजेश पळसकर, विजय खळदकर, स्वप्निल दुधाणे, किशोर कांबळे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.