ओमिक्रॉनचा धोका वाढला; राज्यात सर्वाधिक रुग्ण पिंपरी-चिंचवडमध्ये

आणखी चौघांना ओमिक्रॉनचा प्रार्दुभाव झाल्याने रुग्णसंख्या दहावर गेली असून, ती राज्यात सर्वाधिक आहे.
Omicron Variant
Omicron VariantSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : ओमिक्रॉनचा (Omicron) धोका आता पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpari Chinchwad) वाढू लागला आहे. आज आणखी चौघांना ओमिक्रॉनचा प्रार्दुभाव झाल्याने रुग्णसंख्या दहावर गेली असून, ती राज्यात सर्वाधिक आहे. गेल्या महिन्यात नायजेरियाहून आलेल्या तिघांच्या कुटुंबामुळे शहरातील सात जणांना आतापर्यंत ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे. अद्याप २२ जणांचे ओमिक्रॉन चाचणीचे अहवाल येणे बाकी असल्याने प्रशासन चिंतेत आहे.

गेल्या पंधरवड्यात परदेशातून व त्यातही ओमिक्रॉनचा प्रसार झालेल्या आफ्रिका आणि युरोपमधून शहरात आलेले परदेशी प्रवासी व त्यांच्या संपर्कातील अशा एकूण ३४० जणांची पिंपरी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने आतापर्यंत तपासणी केली. त्यात ११ परदेशी प्रवाशांसह त्यांच्या संपर्कात आलेले २१ अशा ३२ जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात नायजेरियाहून आलेले तिघांचे कुटुंब आणि त्यांच्या संपर्कातील सात अशा दहाजणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचे समोर आले. अद्याप ३२ पैकी २२ जणांचे ओमिक्रॉन तपासणीचा (जिनोम सिक्वेसिंग) अहवाल पुण्यातील `एनआयए` संस्थेतून आलेला नाही.

Omicron Variant
भाजपमध्ये गेलेल्या दोन नेत्यांची आमदारकी धोक्यात; काँग्रेसचा विधानसभेत प्रस्ताव

महापालिकेच्या हद्दीतील २२ मधील १९ रुग्ण पालिकेच्या भोसरी रुग्णालयात, तर तिघे खासगी रुग्णालयात दाखल आहेत. दरम्यान, उपचार घेत असलेल्या सहापैकी चार ओमिक्रॉन रुग्णांच्या कोरोना तपासणीचा अहवाल दहाव्या दिवशी निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. दुसरीकडे शहरातील कोरोना रुग्णंसंख्येत ५८ ने आज भर पडली. मात्र, दाखल एकाचाही मृत्यू झालेला नाही.

Omicron Variant
परमबीरसिंहांनी जबदरस्तीने व्हॉट्सअॅप मेसेज करायले लावले; एसीपीचा गौप्यस्फोट

सध्या १९१ कोरोना रुग्ण दाखल शहरातील विविध रुग्णालयांत दाखल असून १२७ घरीच विलगीकरणामध्ये आहेत.शहरातील बहुतांश नागरिकांचे कोरोना लसीकरण (एक व दोन डोस) पूर्ण झालेले आहे. दरम्यान, पुण्यात ७७ नवे कोरोना रुग्ण आज आढळले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यात अद्याप २८७ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत असून ५०५ गृह विलगीकरणात आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com