भाजपमध्ये गेलेल्या दोन नेत्यांची आमदारकी धोक्यात; काँग्रेसचा विधानसभेत प्रस्ताव

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने इतर पक्षांतील आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
Ram Singh Kaira and Pritam Singh Pawar
Ram Singh Kaira and Pritam Singh Pawar Sarkarnama

डेहराडून : पुढील वर्षी उत्तराखंड (Uttarakhand) विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपने (BJP) इतर पक्षांतील आमदारांना फोडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अपक्ष आमदार प्रीतमसिंह पवार (Pritam Singh Pawar) आणि रामसिंह कैरा (Ram Singh Kaira) यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. आता या आमदारांच्या अपात्रतेसाठी काँग्रेसने (Congress) आक्रमक भूमिका घेत विधानसभेत प्रस्ताव मांडला आहे.

काँग्रेसचे नेते काझी निजामुद्दीन यांनी आज विधानसभेत शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित केला. अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आमदारांनी राजकीय पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरवावे, अशी मागणी त्यांनी केली. अशा परिस्थितीत आमदार राजीनामा देतात परंतु, पवार आणि कैरा यांनी तसे न केल्याने त्यांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवावे, असे ते म्हणाले.

या मागणीला विरोधी पक्षनेते प्रीतमसिंह यांनीही पाठिंबा दर्शवला. विधानसभेचे अध्यक्षांनी यावर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. यावर विधानसभेचे उपाध्यक्ष रघुनाथसिंह चौहान यांनी हे प्रकरण अध्यक्षांसमोर मांडले जाईल आणि तेच त्यावर निर्णय घेतील, असे सांगितले. त्यामुळे या दोन्ही आमदारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे.

Ram Singh Kaira and Pritam Singh Pawar
परमबीरसिंहांनी जबदरस्तीने व्हॉट्सअॅप मेसेज करायले लावले; एसीपीचा गौप्यस्फोट

आमदार पवार आणि कैरा यांनी 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून विजय मिळवला होता. आमदार पवार हे धनौल्टी मतदारसंघाचे तर आमदार कैरा हे भीमताल मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी अनुक्रमे यावर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला होता. प्रीतमसिंह पवार यांनी उत्तराखंड क्रांती दलातून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. भाजपच्या मुख्यालयात केंदीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत पवार यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला.

Ram Singh Kaira and Pritam Singh Pawar
ममतांना मोठा धक्का! तृणमूलचे नेते केंद्रीय तपास यंत्रणेच्या जाळ्यात

निवडणुकीच्या तोंडावर पवार यांच्यासह कैरा यांना आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेसनेही प्रयत्न केले होते. पण त्याआधीच ते भाजपच्या गळाला लागले. उत्तराखंडमध्ये सध्या भाजपची सत्ता आहे. सत्ता टिकवून ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्नांची पराकाष्टा केली जात आहे. काही महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रीही बदलण्यात आले होते. काँग्रेसमधील काही आमदारांनाही पक्षात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com