Nikhil Wagle Attack : भाजप कार्यकर्त्यांकडून निखिल वागळेंच्या गाडीवर दगडफेक; गाडीच्या काचा फुटल्या...

BJP Party Workers Attack on Nikhil Wagle Attack : भाजपच्या कार्यकर्त्यांकडून वागळेंची गाडी फोडली...
Nikhil Wagle Attack
Nikhil Wagle Attack Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे शहरात आज सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, कायदेतज्ज्ञ असीम सरोदे आणि मुक्त पत्रकार निखिल वागळे यांच्या निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण वागळे यांचे भाषण होते. मात्र, या सभेला उधळून लावू, असा इशारा भाजपने दिला होता. त्यानुसार आता कार्यक्रमास्थळी भाजपकडून या सभेला जोरदार विरोध केला जात आहे. खंडूजी बाबा चौक येथे वागळे यांच्या गाडीवर अंडी आणि दगडफेक केली गेल्याची माहिती समोर येत आहे. (Latest Marathi News)

Nikhil Wagle Attack
NCP Crisis : ‘त्याचा राजीनामा आजही माझ्या खिशात’; अजितदादा असं कोणाबद्दल म्हणाले?

दरम्यान, ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याविरोधात भाजपच्या वतीने पोलिस तक्रार देण्यात आली आहे. देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या विरोधात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट केल्याचा ठपका ठेवत, भाजपने ही तक्रार पुण्यातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. (Nirbhay Bano Nikhil Wagle News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमच्याविरुद्ध वादग्रस्त लिखाण करून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न वागळे करत आहेत, त्यामुळे त्यांचे भाषण पुण्यात कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा दम पुणे भाजपने दिला आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये, शहर शांत राहावे, यासाठी पोलिस प्रशासनाने वागळेंच्या सभेला परवानगी देऊ नये, असे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पोलिसांकडे मागणी केली आहे. मात्र, आता वागळेंच्या सभेला भाजपने जोरदार विरोध प्रदर्शन केल्याने पुण्यातील वातावरण तापले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com