Eknath Shinde : खासदार बारणेंना बाहेर थांबवून एकनाथ शिंदे अन्‌ राम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी यांच्यात बंद दाराआड तासभर चर्चा

Govinddev Giri Maharaj-Eknath Shinde Meeting : डुडुळगाव वेदपाठ शाळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची रात्री उशिरा तासभर खासगी चर्चा झाली. खासदार श्रीरंग बारणे यांना बाहेर थांबवले गेले, त्यामुळे राजकीय चर्चा रंगली.
Govinddev Giri Maharaj-Eknath Shinde
Govinddev Giri Maharaj-Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on
  1. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीजवळील डुडुळगाव येथील वेदपाठ शाळेत राममंदिर कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची रात्री उशिरा भेट घेतली.

  2. खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह इतर उपस्थित असतानाही त्यांना बाहेर थांबवून शिंदे आणि गिरी महाराज यांच्यात तब्बल तासभर गुप्त चर्चा झाली.

  3. चर्चेचा तपशील उघड न झाल्याने ही भेट राजकीय होती की आध्यात्मिक, यावर पुण्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Alandi, 28 September : शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्यात शुक्रवारी (ता. 26 सप्टेंबर) रात्री उशिरा आळंदीजवळील डुडुळगाव येथील वेदपाठ शाळेत तासभर चर्चा झाली. विशेष म्हणजे या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत मावळचे खासदार श्रीरंग बारणे हेही हेाते. मात्र, त्यांना बाहेर थांबवून गिरी महाराज आणि शिंदे या दोघांमध्येच संवाद झाला, त्यामुळे खासदारांना बाहेर थांबवून झालेल्या या भेटीची पुण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

नवरात्री उत्सवानिमित्त शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे पुणे दौऱ्यावर आले होते. दिवसभराचे कार्यक्रम उरकल्यानंतर रात्री उशिरा साडेदहाच्या सुमारास एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा हा हवेली तालुक्यातील डुडूळगाव येथील वेदपाठ शाळेमध्ये दाखल झाला.

आयोध्येतील राम मंदिराचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govinddev Giri Maharaj) यांची आळंदीच्या जवळ असलेल्या डुडूळगाव येथे वेदश्री तपोवन वेदपाळ शाळा आहे. त्या वेदपाठ शाळेत महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभरातून विद्यार्थी वेद शिकण्यासाठी येत असतात. त्याच वेदपाठ शाळेत शिंदे आणि गोविंददेव गिरी महाराज यांच्यात चर्चा झाली.

वेदपाठ शाळेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वामी गोविंददेव गिरी यांच्यासह विद्यार्थ्यांनी स्वागत केले. या वेळी वेदपाठ शाळेचे अध्यापक महेश नंदे गुरुजी, विठ्ठलानंद गिरी, आळंदीचे शिवसेना शहराध्यक्ष राहुल चव्हाण, उद्योजक संतोष बारणे, श्रीपाद देशमुख, विनायक घिगे, नितीन ननवरे उपस्थिती होते.

Govinddev Giri Maharaj-Eknath Shinde
Bajrang Sonawane : तुम्ही परळीचे आहात म्हणजे सगळेच मालक झालात का? : खासदार बजरंग सोनावणे संतापले

स्वामी गाेविंददेव गिरी महाराज आणि विद्यार्थ्यांनी एकनाथ शिंदे यांचे स्वागत जाहीरपणे केले. मात्र, दोघांमध्ये चर्चा मात्र गुप्तपणे झाली. खासदार श्रीरंग बारणे आणि इतर सहकारी सोबत असतानाही त्यांना बाहेर थांबवून शिंदे आणि गिरी महाराज यांच्यात बंद खोलीत तब्बल एक तासभर गुफ्तगू झाले. दोघांमधील चर्चेचा तपशील समजू शकला नाही. मात्र, हा दौरा राजकीय होता की आध्यात्मिक स्वरूपाचा होता, याची चर्चा रंगली आहे.

दोघांमधील चर्चेनंतर सर्वांनी मिळून एकत्रिपणे स्नेहभोजन घेतले. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा पुन्हा पुण्याकडे रवाना झाला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अचानकपणे आळंदीत येऊन स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांची भेट घेण्याचे कारण काय, त्यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Govinddev Giri Maharaj-Eknath Shinde
Dattatray Bharane : कृषिमंत्री भरणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले; ‘तुम्ही मदत का करत नाही, टेबलावर बसून काम करू नका’
  1. प्र: एकनाथ शिंदे यांनी कोणाला भेट दिली?
    उ: राममंदिर कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना.

  2. प्र: ही भेट कुठे झाली?
    उ: डुडुळगाव येथील वेदपाठ शाळेत, आळंदी जवळ.

  3. प्र: खासदार श्रीरंग बारणे यांच्याशी काय घडले?
    उ: त्यांना आणि इतरांना बाहेर थांबवून शिंदे–गिरी महाराज यांची बंद खोलीत चर्चा झाली.

  4. प्र: या भेटीवर काय चर्चा सुरू आहे?
    उ: भेट राजकीय की आध्यात्मिक यावर वेगवेगळ्या अटकळी सुरू आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com