Bajrang Sonawane : तुम्ही परळीचे आहात म्हणजे सगळेच मालक झालात का? : खासदार बजरंग सोनावणे संतापले

Beed Flood Update : पूरग्रस्त पंचनाम्यासाठी तलाठ्यांनी पैसे मागितल्याच्या तक्रारीवर खासदार बजरंग सोनवणे संतापले. “लोक मरताना तुम्ही टाळूवरचे लोणी खाताय का?” असा सवाल उपस्थित अधिकाऱ्यांना करून त्यांनी भ्रष्टाचारावर कडक टीका केली.
Bajrang Sonawane
Bajrang SonawaneSarkarnama
Published on
Updated on

३ मुद्द्यांचा सारांश

  1. अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी खासदार बजरंग सोनावणे यांना तलाठी पंचनाम्यासाठी पैसे मागत असल्याची तक्रार केली.

  2. संतापलेल्या खासदारांनी तलाठ्याला “लोक मरायला लागले तरी टाळूवरचे लोणी खाता का?” असा जाब विचारत तात्काळ पंचनामा व मदत सुरू करण्याचे आदेश दिले.

  3. पूरग्रस्तांना २४ तासांत पाच हजार रुपयांची मदत देण्याची गरज असल्याचे सांगत सोनावणे यांनी अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावले.

Beed, 27 September : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना, पंचनाम्यासाठी तलाठी पैसे मागत असल्याचे शेतकऱ्यांनी खासदार बजरंग सोनावणे यांना सांगितले. तेव्हा संतापलेल्या खासदारांनी ‘लोक मरायला लागले तरी तुम्ही त्यांच्या टाळूवरचे लोणी खाता काय? अन्‌ तुम्ही परळीचे आहात म्हणजे सगळेच मालक झालात का? असा सवाल खासदार सोनवणे यांनी केला. तेव्हा उपस्थित अधिकाऱ्यांचीही बोलती बंद झाली.

पूरग्रस्तांना तातडीने २४ तासांच्या आतमध्ये पाच हजार रुपये द्यायला पाहिजे. ते दिले का? असा सवाल खासदार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी उपस्थित केला. त्यावर आज संध्याकाळपर्यंत पैसे जमा होतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे अकाउंट नंबर घेतले आहेत का? तुम्ही तलाठी आहात ना. त्यावर हे मंडलाधिकारी आहेत. तलाठी मागे आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. तलाठ्याला उद्देशून ‘तू माग मागंच लपायला? काय केलं तू?, असा सवाल सोनवणे यांनी केला.

उपस्थित एका शेतकऱ्याने तलाठी (Talati) यादीला पैसे मागत असल्याचे सांगितले. त्यावर खासदारांनी कशाला पैसे मागतो? कुठलं गाव आहे? पैसे कशाला घेता? फालतू धंदे करू नका. माझी हात जोडून विनंती आहे. लोक मरायला तरी तुम्ही त्यांच्या टाळूवरचे लोणी खाता काय? मग आतापर्यंत पंचनामा का केला नाही, आहे का कागद तुझ्या हातात.? असे सवाल केले.

खासदारांनी तलाठ्याला जाब विचारताच एका शेतकऱ्याने ते फक्त नाव लिहून घेत आहेत’ असे सांगितले. तेव्हा तलाठी तक्रार करणाऱ्या नागरिकाकडे रागाने पाहत होते. तेव्हा त्यांच्याकडे बघू नको, असे खासदारांनी सुनावले. ते फक्त नाव लिहून घेत आहेत, अशी तक्रार करताच तलाठ्याने ‘नाही नाही पंचनाम केला आहे,’ असे सांगितले.

Bajrang Sonawane
Dattatray Bharane : कृषिमंत्री भरणेंनी जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले; ‘तुम्ही मदत का करत नाही, टेबलावर बसून काम करू नका’

‘मला तलाठ्यांचा रिपोर्ट द्या,’ असे सांगितले. दोनशे लोकांची यादी दिली म्हणून सांगता, मग या तलाठ्याने काय रिपोर्ट केला, हे सांगा? काय पंचनामा केला आहे?, ते दाखवा. मंडलाधिकारी तुम्ही असं काय करता? ह्याच्यात तुम्हाला राजकारण करायचं असेल तर शिंदे, मी सोडणार नाही. मी इथं यायचं कारण म्हणजे मला अनेकांनी तलाठी राजकारण करतोय, अशा तक्रारी आल्या आहेत.

शेतकऱ्यांची जनावरे, कोंबड्या वाहून गेल्या तर त्याला मदत करायची. काही जनावरे गेली तर त्याचा तुम्ही पीएम करणार आहे का? त्यावर ‘करणार’ असे उत्तर तलाठ्याने दिले. तलाठ्याच्या उत्तराने संतापलेले खासदार सोनवणे यांनी वाहून गेलेल्या जनावरांचं पीएम कसं करणार, असा जाब विचारला. आपण सरकारचा एवढा मोठा पगार घेता आपल्याला नियम तरी माहिती पाहिजे, असेही सोनावणेंनी सुनावले.

गोरगरिब लोकांकडून अशा परिस्थिती पैसे मागता म्हणजे काय? तुम्ही परळीचे आहात, म्हणजे सगळेच मालक झालात का. असं नका करू. गोरगरिब लोकांना माझ्या किंवा तुमच्या घरून पैसे द्यायचे नाहीत. हे अधिकारी माझ्यासोबत गेल्या दोन तासांपासून आहेत. त्यांना एक शब्द तरी वेडावाकडा बोललो का विचारा. अधिकाऱ्यांचा सन्मान करायची आम्हाला सवय आहे. पण, तुम्हाला असं कसं संस्कार आहेत. तुमची लेकरं बाळं घरातील अडकली. कुणी नाही वाचवलं तर? असा सवालही सोनवणेंनी तलाठ्याला विचारला.

Bajrang Sonawane
Sadabhau Khot : आठ दिवस कुठं होता? नुसते फोटो काढायला आलात का?; माढ्यातील शेतकऱ्यांचा रोष पाहून हात जोडत सदाभाऊंचा काढता पाय
  1. प्र: शेतकऱ्यांनी कोणती तक्रार खासदारांना केली?
    उ: पंचनाम्यासाठी तलाठी पैसे मागत असल्याची.

  2. प्र: पूरग्रस्तांना किती रकमेची तातडीची मदत मागितली गेली?
    उ: प्रत्येकी पाच हजार रुपये २४ तासांत.

  3. प्र: खासदारांनी कोणाला जाब विचारला?
    उ: तलाठी आणि मंडलाधिकारी अधिकाऱ्यांना.

  4. प्र: सोनावणे यांनी कोणत्या कारणावरून संताप व्यक्त केला?
    उ: मदतीत विलंब आणि नागरिकांकडून अवैध रकमेची मागणी यावर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com