Housing Society Security: सोसायट्यांमध्ये आता प्रवेश नोंदणी, बायोमेट्रिक अनिवार्य? कोंढव्यातील अत्याचाराच्या घटनेनंतर सरकारची नवी नियमावली

Housing Society Security: या प्रकरणात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
Neelam Gorhe
Neelam Gorhe
Published on
Updated on

Housing Society Security: पुण्यातील कोंढवा येथील उच्चभ्रू आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गेटेड सोसायटीत एका २५ वर्षीय महिलेवर डिलिव्हरी बॉयकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर सरकारनं आता नवी नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार आता सोसायटीत बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश नोंदणी आणि बायोमेट्रिक बंधनकारक करण्यात आलं आहे. त्याचबरोबर इतरही अनेक नव्या नियमांचं पालन करावं लागणार आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तांकडं याप्रकरणी तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.

Neelam Gorhe
Urban Naxal: आषाढी वारीत 'अर्बन नक्षल'! सरकारला नेमकी भीती कशाची?

डॉ. गोऱ्हे म्हणल्या, "काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास एका गेटेड सोसायटीमध्ये एका व्यक्तीनं कुरिअर बॉय म्हणून प्रवेश मिळवला आणि पीडितेच्या घरी जाऊन तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार केला. यानंतर आरोपीनं पीडितेच्या मोबाईलवर धमकीवजा मेसेजही पाठवला. याप्रकरणी विशेष तपास पथकाची तत्काळ स्थापना करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे पथक तयार करून घटनेचा सखोल तपास केला जावा, अशी मागणीही केल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख पटवून त्याला तत्काळ अटक करण्यात यावी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत तसेच भारतीय न्याय संहितेतील इतर तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करून अनुभवी विधी अधिकाऱ्यांच्या मदतीने लवकरात लवकर चार्जशीट दाखल करावी, अशी त्यांनी सूचना केल्याचंही त्यांनी सांगितलं.

Neelam Gorhe
CM Siddaramaiah: पोलीस अधिकाऱ्यावर उचलला हात! पत्रकाराला विचारलं भाजपचा आहेस का?; अखेर मुख्यमंत्र्यांची विनवणी करताना दमछाक

दरम्यान, या घटनेनंतर सोसायट्यांमधील सुरक्षाव्यवस्थेतील त्रृटी स्पष्टपणे समोर आली असून डॉ. गोऱ्हे यांनी सुरक्षारक्षक, रजिस्टर नोंदी व प्रवेश यंत्रणेची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व गेटेड सोसायट्यांमध्ये प्रवेश नोंदणी सक्तीची करणे, बायोमेट्रिक किंवा डिजिटल लॉग प्रणाली अनिवार्य करणे आणि महिला सुरक्षेसाठी हेल्पलाइन क्रमांक सोसायटीमध्ये दिसेल अशा पद्धतीने लावणे बंधनकारक करण्याचा प्रस्तावही गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत मांडला. तसंच, पोलीस प्रशासनानं 'सोसायटी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे' तयार करून सर्व सोसायट्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com