Shivajirao Adhalrao Patil : अमोल कोल्हे भाजपात आलेच तर प्रचार करेन पण 'या' अटीवर; आढळराव स्पष्टच बोलले

Amol Kolhe : कोल्हेंमुळे महायुतीची ताकद वाढेल
Shivajirao Adhalrao Patil, Amol Kolhe
Shivajirao Adhalrao Patil, Amol KolheSarkarnama

Amol Kolhe and Shivajirao Adhalrao Patil : काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. कोल्हे आले तर माजी खासदार आढळरवांची समजूत घालावी लागेल, असे भाजपचे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. आता कोल्हे भाजपमध्ये आले तर महायुतीची ताकद वाढेल, तसेच त्यांचा प्रचारही करेन, असे स्वतः शिवसेनेचे उपनेते माजी खासदार आढळराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Shivajirao Adhalrao Patil, Amol Kolhe
Parbhani Ncp News : पवारसाहेब निर्णयावर ठाम असतील, तर माझाही राजीनामा...

पिंपरी-चिंचवड येथे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे सांगितले. आढळराव पाटील म्हणाले, "युतीत शिरूरची जागा शिवसेनेकडे (Shivsena) आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्यामुळे आगामी लोकसभा लढणार यात काही शंका नाही. त्यासाठी गेल्या चार वर्षांपासून तयारी करत आहे."

Shivajirao Adhalrao Patil, Amol Kolhe
Supreme Court News : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रतिक्षा संपणार... 'या' तारखा महत्त्वाच्या...

यावेळी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहेत. ते शिरुरमधूनच लढतील, त्यावर भूमिका काय, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आढळराव म्हणाले, "ते येतात की नाही हे अजून नक्की नाही. मात्र ही जागा शिवसेनेची आहे. चंद्रकांत पाटलांनी त्यांची समजूत घालावी. उद्धव ठाकरे म्हणाले होते पुण्यातून लढा. त्यावेळी त्यांनाही सांगितले होते मला पद नको. माझी तीन टर्म झाल्या आहेत. मला फक्त ताकद द्या. आता तिकिटासाठी शिंदेंकडे आलोय असेही नाही. तेवढा मी प्रोफेशनल राजकारणी नाही. पण मी शिरुरमधून लढण्यावर ठाण आहे."

Shivajirao Adhalrao Patil, Amol Kolhe
Kalamnuri APMC News : बाद मतांमुळे झाला आमदार बांगरांचा `करेक्ट कार्यक्रम`..

आढळरावांनी यावेळी भाजपमध्ये आले तर एका अटीवर अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा प्रचारही करेन असेही स्पष्ट केले. ते म्हणाले, "निवडणूक आणि राजकारण महत्वाचे नाही. लोकांमध्ये मिळून-मिसळून राहणे महत्वाचे आहे. निवडून आल्यानंतर आणि आजही तेच मिळते. त्यामुळे चार वर्षांपासून सुखी आहे. अमोल कोल्हे आले तर महायुतीची ताकद वाढेल. तसेच ते भाजपमध्ये आले तर त्यांचा प्रचार करेन, पण ते कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार यावर अवलंबून असेल."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com