Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील निकालामुळे केंद्रातील सरकार पडणार, माजी मुख्यमंत्र्यांचा मोठा दावा

Prithviraj Chavan On Assembly Election 2024 : लोकसभेला मिळालेल्या घवघवीत यशामुळे आता देशातील इंडिया आघाडीसह राज्यातील महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढला आहे. तर दुसरीकडे एनडीए आघाडीत मात्र काही प्रमाणात निराशा आहे.
Narendra Modi, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
Narendra Modi, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 10 August : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यास केंद्रातील मोदी सरकार पडणार असल्याचा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे. लोकसभेला मिळालेल्या घवघवीत यशामुळे आता देशातील इंडिया आघाडीसह राज्यातील महाविकास आघाडीचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढला आहे.

तर दुसरीकडे 'एनडीए'त(NDA) मात्र काही प्रमाणात निराशा आहे. लोकसभेप्रमाणेच विधानसभेला यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. शिवाय लोकसभेचं यश पाहता आता विधानसभेलाही आपलाच स्ट्राइक रेट जास्त असणार असंही आघाडीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यात मविआ 255 पार करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र, आघाडीतील काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आकडा मात्र पवारांपेक्षा बराच कमी आहे. चव्हाण यांनी आघाडी राज्यात 183 चा आकडा पार करेल असं सांगितलं आहे. शिवाय महाराष्ट्रात विधानसभेला सत्तांतर झाल्यावर केंद्रातील मोदी 3.0 सरकार पडणार असा मोठा दावा देखील चव्हाण यांनी केला आहे.

Narendra Modi, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
PM Narendra Modi : SC, ST आरक्षणाबाबत भाजपचे 100 खासदार पंतप्रधानांच्या भेटीला; मोदी म्हणाले..

रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण लिखित 'हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे?' या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) आणि मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमा दरम्यान बोलताना चव्हाण यांनी आघाडी 183 आकडा पार करेल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी ते म्हणाले, "लाडकी बहीण योजना आम्ही कर्नाटक, तेलंगणामध्ये राबवली. त्यात जनतेची काहीही लूट केली नाही. मात्र, महाराष्ट्रात जीएसटी, इंधनाचे दर वाढवून लोकांना लुटल्यानंतर युती सरकारला लाडकी बहीण योजना आठवत आहे. राज्यावर 7.80 लाख कोटींचे कर्ज आहे. लिलाव करुन जिल्हानिहाय प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. काही ठेकेदार मिळून सरकार चालवत असल्याचा गंभारी आरोपही त्यांनी केला.

Narendra Modi, Ajit Pawar, Eknath Shinde, Devendra Fadnavis
MVS Vs Mahayuti : मोठी बातमी! राज्यात सत्तापरिवर्तन, महाविकास आघाडीचं सरकार येणार? 'या' सर्व्हेनं महायुतीचं टेन्शन वाढवलं

तसंच यावेळी आमचं सरकार येणार असल्याचे संकेतही दिले. ते म्हणाले, सध्या सुरु असलेल्या या गोष्टींवर आमच्या नव्या सरकारमध्ये बदल्यांवर अंकुश ठेवावा लागेल. मी मुख्यमंत्री असताना विमा योजना सुरू करून दीड लाखापर्यंत कवच दिले. खासगीपेक्षा सरकारी विमा कंपनीला कंत्राट देण्याचा आमचा आग्रह होता. मात्र या सरकारने 5 लाखांपर्यंत विमा योजना वाढवली, पण ती केवळ कागदावर आहे असल्याची टीकाही चव्हाण यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com