Laxman Mane News: 'आता पोट भरलं असेल तर आवरा...'; लक्ष्मण मानेंनी प्रकाश आंबेडकर, आठवलेंवर डागली तोफ

Political News : गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सोबतच्या नेत्यांसोबत बैठका झाल्यानंतरही प्रकाश आंबेडकरांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली, मात्र प्रकाश आंबेडकरांच्या या भूमिकेमुळे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होते, असा आरोप त्यांच्यावर केला जातोय.
Laxman Mane
Laxman ManeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : माजी आमदार लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर व रामदास आठवलेंवर थेट हल्ला केला, कोणत्याही परिस्थितीत आरएसएस आणि भाजपला मदत करू नका, असे सांगत लक्ष्मण माने यांनी आंबेडकरांवर टीका केली.

नुकतंच वंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवारांची तिसरी यादीही जाहीर केलीय, वंचित बहुजन आघाडी राज्यातल्या महत्वाच्या जागा लढणार आहे, गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सोबतच्या नेत्यांसोबत बैठका झाल्यानंतरही प्रकाश आंबेडकरांनी एकला चलो रे ची भूमिका घेतली, मात्र प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) या भूमिकेमुळे अप्रत्यक्षपणे भाजपला मदत होते, असा आरोप त्यांच्यावर केला जातोय, यावरच लक्ष्मण माने (Laxman Mane) यांनी प्रकाश आंबेडकरांवर थेट टीका केली आहे.

Laxman Mane
Nanded Loksabha Constituency : 'फडणवीसांनी काही सांगितलं अन् मी ऐकलं नाही असं कधीच झालं नाही'; चव्हाण यांचे मोठे विधान !

पुण्यात मीडियाशी बोलताना लक्ष्मण माने यांनी ही टीका केली. माने म्हणाले, भटक्या विमुक्त जमाती संघटना, धनगर समाज, वंजारी समाज. या समाजाच्या वतीने पद्मश्री माजी आमदार लक्ष्मण माने, ऍड. माजी आमदार विजय मोरे, ऍड. माजी आमदार उषा दराडे यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्त सर्व संवर्गातील समाज बांधवांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे.

माने म्हणाले, संपूर्ण राज्यभर 9 एप्रिल ते 9 मे 2024 काळात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भटक्या विमुक्तांच्या मेळाव्यांमधून मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी व अल्पसंख्याक समाजाच्या सर्व बांधवांनी या जयंती महोत्सवात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारताची राज्यघटना आणि आपल्याला मिळालेले मूलभूत अधिकार ही आपली कवच कुंडले आहेत. भारताची राज्यघटना बदलु इच्छिणाऱ्यांना साता समुद्रापार फेकल्याशिवाय आता थांबायचे नाही. संघटितरित्या आरएसएस व भाजपला सत्तेतून दूर केल्याशिवाय थांबवायचे नाही, अशी घोषणा देखील पद्मश्री लक्ष्मण माने व ऍड. विजय मोरे यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केली.

(Edited By : Sachin Wghmare)

Laxman Mane
Laxman Mane : मराठा आरक्षणाबाबत लक्ष्मण मानेंचे मोठे विधान; म्हणाले, 'केंद्राने मर्यादा...'

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com