नितीन गडकरींचा सल्ला पुणे पालिका ऐकणार; ...पण बजेटमध्ये बसला तरच

गडकरी यांनी सुचविलेल्या सल्लागार कंपनीशी संपर्क साधला आहे.
नितीन गडकरीं
नितीन गडकरींसरकारनामा
Published on
Updated on

पुणे : पुण्यातील सिंहगड रस्त्यावर उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या रचनेत बदल करून तेथे दुमजली उड्डाणपूल उभारण्याची सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलाच्या भूमीपूजनाच्यावेळी गेल्या महिन्यात केली. त्यानुसार महापालिकेने यासाठी चाचपणी सुरू केली आहे. पुलची केलेली रचना व इतर माहिती संबंधित सल्लागारास पुरवली आहे.या उड्डाणपुलाच्या रचनेत कसा बदल करता येऊ शकतो यावर चर्चा केली जाणार आहे. खर्चात वाढ होणार नसेल व रचना योग्य असेल तर नव्या प्रस्तावानुसार बदल स्वीकारले जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

नितीन गडकरीं
एकनाथ शिंदेंच्या गुप्त भेटीने पाचोरा-जळगावात चर्चांना उधान

सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राजाराम पूल ते फनटाइन थिएटरपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका १३५ कोटी रुपये खर्च करणार आहे. या उड्डाणपुलाचे भूमीपूजन नितीन गडकरी यांच्या हस्ते सप्टेंबर महिन्यात झाले आहे.त्यावेळी गडकरी यांनी ‘‘ उड्डाणपूल उभारताना यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बदल करता येऊ शकतो. या रस्त्यावर दुमजली उड्डाणपूल व मेट्रोसाठीचे नियोजन करणे शक्य आहे. हे तंत्रज्ञान वापरल्याने पिलरची संख्या कमी होईल. हे काम १३५ कोटी रुपयांमध्येच होईल, खर्च वाढणार नाही. त्यामुळे याचा विचार करा.’’ अशी सूचना केली होती.

नितीन गडकरीं
पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइकची गरज

गडकरी यांनी सुचविलेल्या सल्लागार कंपनीशी संपर्क साधला आहे.या कंपनीला महापालिकेचा सध्याचा आराखडा, मेट्रोची अलाइनमेंट यासह इतर माहिती पुरविली आहे. या सल्लागार कंपनीकडून

महापालिकेला प्रस्ताव सादर झाल्यानंतर पिलरची संख्या कमी करताना उड्डाणपुलाची रुंदी कमी होणार नाही याकडेही लक्ष दिले जाणार आहे. तसेच कशा पद्धतीने नवीन उड्डाणपुलाचा प्रस्ताव सादर होतो, त्यासाठी खर्च किती होणार? या बाबी तपासल्या जाणार आहेत. त्यानंतर बदल करण्याचा अंतिम निर्णय होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com