दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी

उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करणे आवश्यक आहे.
पुणे विभागीय मंडळ
पुणे विभागीय मंडळसरकारनामा
Published on
Updated on

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गेल्या महिन्यात तसेच या महिन्याच्या सुरवातीला घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

परीक्षेचा ऑनलाइन निकाल ‘www.mahresult.nic.in’ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय गुणांसह उपलब्ध होणार आहे.राज्य मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा २२ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान, तर बारावीची पुरवणी परीक्षा १६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर दरम्यान घेण्यात आली. ऑनलाइन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयात त्यांना मिळालेल्या गुणांची गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

पुणे विभागीय मंडळ
नितीन गडकरींचा सल्ला पुणे पालिका ऐकणार; ...पण बजेटमध्ये बसला तरच

दहावीसाठी ‘http://verification.mh-ssc.ac.in’ आणि बारावीसाठी ‘http://verification.mh-hsc.ac.in’ या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २१ ते ३० ऑक्टोबर.छायाप्रतीसाठी अर्ज करण्याचा कालावधी : २१ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर

पुणे विभागीय मंडळ
रामदास आठवले म्हणाले; पुण्याच्या महापौरपदाचा फडणविसांनी शब्द दिलाय

उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करणे आवश्यक आहे.

उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी शुल्क भरून अर्ज करावा.

उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी आणि त्याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com