Sushma Andhare Vs Devendra Fadnavis: महाराष्ट्राच्या राजकारणातून भाजपच फडणवीसांना बाहेर करणार; अंधारेंचं मोठं विधान

Sushma Andhare criticized Devendra Fadnavis in Pune : शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुण्यात निशाणा साधला. भाजप महाराष्ट्राच देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून आऊट करत असल्याचा दावा सुषमा अंधारेंनी केला.
Sushma Andhare Vs Devendra Fadnavis
Sushma Andhare Vs Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

"भाजप नेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील भाजपच राज्याच्या राजकारणातून लवकरच आऊट करणार आहे. राज्यातील राजकारणाला जातीय रुप दिले जात असून, राजकारणात जातीपातीचं विष कालवण्याचं काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे", असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

सुषमा अंधारे पुणे इथं माध्यमांशी संवाद साधला. भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जातीपातीच्या राजकारणावर त्या तुटून पडल्या. राज्यातील भाजपच त्यांच्या जातीपातीच्या राजकारणाला वैतागला आहे, असे सांगून राज्यातील महाराष्ट्र भाजपच्या टार्गेटवर फडणवीस आहेत. महाराष्ट्रातील भाजप त्यांना लवकरच राज्याच्या राजकारणातून आऊट करणार आहेत, असे गौप्यस्फोट सुषमा अंधारे यांनी केला.

Sushma Andhare Vs Devendra Fadnavis
Raj Thackeray Vs Uddhav Thackeray : सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार; मनसेची ठाकरे गटाला वॉर्निंग!

महायुतीच्या राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. महायुतीमधील मंत्री लाडकी योजना घेऊन राज्यभर फिरत आहेत. "कितीही लाडके, लाडके म्हणत, असतील, तरी जनतेच्या मनात हे तिन्ही लोक आता दोडके झाले आहे. या तिघांकडे मतांची कडकी आहे. म्हणून लाडके, लाडके करत आहेत आणि जनतेला देखील त्याची पूर्णपणे कल्पना आहे. ही लाडके राहणार नसून लोकांनी यांना धडकी भरवायचे ठरवले आहे", असा टोला देखील शिवसेनेच्या (Shiv Sena) सुषमा अंधारे यांनी लगावला.

Sushma Andhare Vs Devendra Fadnavis
Video Shivendraraje Bhosale : मराठा आरक्षणासाठी देवेंद्र फडणवीसांच्या मागे उभे राहा, शिवेंद्रराजे भोसले यांचे मराठा बांधवांना आवाहन

"राज्याच्या राजकारणात जातीय विष पेरले गेले आहे. हे काम कोणी केले सर्वांना माहीत आहे. राज्याच्या जाती-पातीचं विषं कालवायचं काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. आता हे काम त्यांची माणसे पुढे चालवत आहेत. भाजपने प्रसिद्ध केलेल्या रॅपमध्ये इंदिरा गांधी, पंडित नेहरू यांचा फोटो वापरला असून, खूप गलिच्छ रॅप बनवला आहे. मला यांच्या राजकारणाची कीव येते. देवेंद्र फडणवीस यांना कितीही काही करू देत, पण त्यांना सांगते ते आणि भाजप महाराष्ट्रच्या टार्गेटवर आहेत. राज्यातून भाजपच त्यांना आऊट करत आहे. हे त्यांनी ओळखावे", असा सल्ला देखील सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

मंत्रिमंडळावर टोमणा

पुण्यातील आरोग्य व्यवस्थेचे वाटोळे महायुतीच्या राज्य सरकारच्या काळात अधिक झाले. इथं परिवर्तनाची खरी गरज आहे. व्यवस्था ढीम झाली आहे. ससूनमध्ये रक्त बदलतात, किडनी बदलतात, रुग्णालयात ड्रग्सचे रॅकेट सापडते, असं बरचं काही होते. आरोग्य मंत्री त्यातल्या त्यात भारी माणूस, एखादा आजार डासांनी होतो की, पाण्यानं हेच त्यांना माहीत नाही. ज्याच्याकडे राज्या उत्पादन शुल्क विभागाचं खातं दिलं आहे, तो बाबा विधानभवनात तंबाखू खातो. ज्याला कृषीमंत्री केलं, त्याला शेतीमधलं कळत नाही. त्यामुळे आपलं राज्याचे मंत्रिमंडळ 'लय भारी' आहे, असा टोमणा सुषमा अंधारे यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com