Devendra fadanvis : कुंडमळा दुर्घटनेतील मृत अन् जखमीबाबत सीएम फडणवीस यांनी दिली महत्त्वाची माहिती

Kundmala mishap update News : या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस सातत्याने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबंधित तहसीलदारांशी संपर्कात असून, काही लोक वाहून गेल्याने त्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे.
devendra fadnavis
devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून, घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून, त्यांना फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच “त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” असेही फडणवीस (Devendra fadnavis) म्हणाले. या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस सातत्याने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबंधित तहसीलदारांशी संपर्कात असून, काही लोक वाहून गेल्याने त्यांचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफची तुकडी दाखल झाली असून, मदत व बचावकार्याला वेग देण्यात आला आहे.

devendra fadnavis
Kundmala Bridge Collapses : इंद्रायणीवरील कुंडमळ्याजवळील पूल कोसळला, दोन पर्यटक दगावले, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

आतापर्यंत 6 जणांना वाचवण्यात यश आले असून, एकूण 32 जण जखमी झाले आहेत. त्यापैकी 6 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घटनास्थळी स्वतः विभागीय आयुक्त रवाना झाले असून, संपूर्ण परिस्थितीवर उच्च पातळीवर लक्ष ठेवले जात आहे, असे फडणवीस म्हणाले.

devendra fadnavis
Indrayani River Bridge Collapsed : इंद्रायणी नदीवरील कुंडमळ्यातील पूल कोसळण्याचे धक्कादायक कारण आले समोर !

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा गावाजवळ इंद्रायणी नदीवरील लोखंडी पुल कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झाला असून, 6 जणांना वाचविण्यात यश आले आहे. या घटनेत 32 जण जखमी झाले आहेत, त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. काही लोक नदीत वाहून गेल्याची शक्यता आहे, ज्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

devendra fadnavis
Indrayani River Bridge Collapsed update : कुंडमळा पूल दुर्घटनेत 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती, मृतांचा आकडा वाढण्याची भीती, पुलाबाबत अजितदादांनी दिली महत्वाची माहिती...

दरम्यान, एनडीआरएफच्या जवानांना आतापर्यंत पाच जणांना वाचवण्यात यश आले आहे. दुर्घटनास्थळी 20 ते 25 रुग्णवाहिका या ठिकाणी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे वाहून गेलेले पर्यटक नेमके किती दूर गेले असतील, याचा अंदाज एनडीआरएफच्या जवानांकडून घेतला जात आहे. त्यासोबतच बचावकार्य केले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com