Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. भाजप पुणे शहराध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक होते. मात्र धीरज घाटे यांची फेर नियुक्ती झाल्याने शहराध्यक्ष होण्यास इच्छुक असलेले आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आणि या नाराजी मुळे भाजप अंतर्गत गृहकलह सुरू आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण शहराध्यक्षपदी घाटे यांची नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर त्यांचा नियुक्तीपत्र देण्याच्या आयोजित कार्यक्रमाकडे शहर पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचं बोललं जात आहे.
भाजपचे नवनिर्वाचित पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांना नियुक्तीपत्र देण्यासाठी घरकुल लॉन्स येथे आयोजित करण्यात आला होता.त्यासाठी सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमाला पाच वाजता उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात हाताच्या बोटावर मोजण्या एवढेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. तर इतर पदाधिकारी न दिसल्याने अनेक जण बाहेरूनच निघून गेले. त्यामुळे हा नियोजित कार्यक्रम पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या अनुपस्थितीमुळे रद्द करून तो पक्ष कार्यालयात हलवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
कार्यक्रमासाठी केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार आणि पुणे जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक धनंजय महाडिक, तसेच पुणे शहर निरीक्षक शेखर इनामदार हे उपस्थित होते. शहरातील सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले होते, मात्र हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पदाधिकारी आणि माजी नगरसेवक प्रत्यक्षात उपस्थित होते.
शहर पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत मुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. राज्यभरात भाजपने संघटनात्मक फेरबदल करत असताना पुण्यात मात्र विद्यमान शहराध्यक्षांनाच पुन्हा संधी देण्यात आली, यामुळे इतर इच्छुकांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे.
महापालिकेत भाजपचे सुमारे 100 माजी नगरसेवक आहेत. यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिकेत बोलविलेल्या नाले सफाईच्या बैठकीस हजेरी लावली. मात्र, या बैठकीनंतर घाटे यांच्या नियुक्तीकडे अनेकांनी पाठ फिरविली त्यामुळे पक्ष कार्यालयात केवळ घाटे यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी होती असं सांगितलं जात आहे.तर 105 मधील अवघे डझनभर नगरसेवक उपस्थित होते. सध्या हा विषय राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरत आहे.
पावसाचं वातावरण असल्याने काही पदाधिकारी उशिरा आले तसेच सदर ठिकाणावरत पाणी साठण्याची शक्यता असल्याने कार्यक्रम स्थळ बदलण्यात आले असल्याचं भाजपकडून सांगण्यात आले आहे. तसेच भाजपमध्ये कोणतंही अंतर्गत गट गट नाही, असे देखील भाजपचे पदाधिकारी पुष्कर तुळजापूरकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.