Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar
Chandrashekhar Bawankule, Ajit PawarSarkarnama

Ajit Pawar News : बावनकुळेंनी अजित पवारांना डिवचलं; म्हणाले, "अजितदादांना त्यांच्याच पक्षात काम..."

Chandrashekhar Bawankule On NCP : महाविकास आघडातून मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुकांचीच संख्या जास्त
Published on

BJP Vs NCP : महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचे इच्छुकच जास्त आहेत. राष्ट्रवादीक काँग्रेसकडून तीन, काँग्रेसचे चार तर शिल्लक सेनेचे दोन नेते मुख्यमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. त्यांचे ठिकठिकाणी बॅनर लागत आहेत. परंतु त्या सर्वांचे स्वप्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धुळीस मिळवणार आहेत, असा घाणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. (Latest Political Marathi News)

केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचा मेळावा शनिवारी (दि. २४) माळेगाव बुद्रूक (ता.बारामती) येथे आयोजित केला होता.यावेळी चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षावर टीका केली. यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोध पक्षनेते अजित पवार यांना टोले लगावले.

Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar
Maharashtra Karnataka Border Issue: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तातडीने सोडवण्यासाठी जयंत पाटील घेणार वकिलांची भेट !

बावनकुळे म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार दमदार नेते आहेत. अजितदादा हे त्यांच्या पद्धतीने काम करणारे नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कामाची चुणूक अनेक वेळा मंत्रिमंडळामध्ये दाखवली आहे. त्यांच्यावर मात्र त्यांच्याच पार्टीत काम मागण्याची वेळ आली. पक्ष संघटनेत काम करण्याची इच्छा बोलून दाखवावी लागणे हे दुर्दैव आहे."

बावनकुळे यांनी यावेळी शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, "पवारसाहेब अनेक वर्षे राजकारणात आहेत. परंतु त्यांना स्वतःच्या हिंमतीवर राज्यात सरकार स्थापन करता आले नाही. त्यांनी सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवली. तशीच स्थिती काँग्रेसची आहे. शिल्लक सेनेची स्थितीतर त्याहून वाईट आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९मध्ये भाजपचे मुख्यमंत्री पद चोरून घेतले. मिळालेल्या पदाचा उपयोग मात्र स्वतःच्या कुटुंबासाठी केला. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या शिल्लक पक्षाला महत्व राहिले नाही."

Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar
Anil Deshmukh News : नरखेड खरेदी विक्रीवर अनिल देशमुखांचे वर्चस्व, ठाकरे गटाचा अचानक पाठिंबा !

या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपने बारामती विधानसभेतून अजित पवार यांच्यापुढे आव्हान निर्माण करणार असल्याचे दिसून येत आहे. बारामती विधानसभा मतदारसंघातील ६० हजार घरांमध्ये पोचण्याचा निर्धार येथील भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी आमदार राहुल कुल, भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे, बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, पांडुरंग कचरे, युवराज तावरे, जी.बी.गावडे, सतिश फाळके, मुरलीधर मोहळ, राजेश पांडे, अशोकराव रस्ते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com