Koregaon Park land scam: "जय पवारांच्या लग्नाला जायचं आहे": कोरेगाव पार्क जमीन घोटाळ्यातील आरोपीची पोलिसांना विनंती; अंजली दमानियांचा विरोध

accused seeks wedding permission News : जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या शितल तेजवानीला बुधवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर गुरुवारी दुपारी कोर्टात हजर करण्यात आले.
land fraud
land fraudSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मुंढवा भागातील 40 एकर जमीनच्या गैरव्यवहार प्रकरणात आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमोडीया येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी गेल्या काही दिवसापासून पॉवर ऑफ ऑटर्नीचा गैरवापर केल्याप्रकरणी शीतल तेजवानी यांची तर या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या दिग्विजय पाटील यांची पोलीस चौकशी सुरु आहे. या जमीन गैरव्यवहार प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या शितल तेजवानीला बुधवारी दुपारी पोलिसांनी अटक केली. त्यानंतर गुरुवारी दुपारी कोर्टात हजर करण्यात आले. तर दुसरीकडे 'जय पवारांच्या लग्नाला जायचे आहे", त्यामुळे लग्नाहून परत आल्यानंतर उर्वरित चौकशी करा, अशी विनंती दिग्विजय पाटील यांनी पोलिसांना केली असून त्याला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी विरोध केला आहे.

अमोडीया येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी पॉवर ऑफ ऑटर्नीचा गैरवापर केल्याप्रकरणी तेजवानीला अटक करण्यात आली. पार्थ पवार यांच्या कंपनीला तेजवानी यांनी बेकायदेशीररित्या जमिनीची विक्री केली होती. या प्रकरणाची गेल्या काही दिवसापासून चौकशी सुरु आहे. मुंढवा भागातील 40 एकर जमीन व्यवहारात सहा कोटींचे मुद्रांक शुल्क न भरता शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी यापूर्वी जिल्हा निबंधक संतोष हिंगाणे यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार तिघांवर गुन्हा दाखल झाला होता.

land fraud
Shivsena UBT vs BJP : 'मोदी काळात भारत गोमांस निर्यात करणारा महत्त्वाचा देश बनला, संघ-भाजप मंदिरे तोडत आहेत आणि भक्त 'नमो नमो'च्या नकली हिंदुत्वात गुंग झालेत...'

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि निलंबित सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचा समावेश होता. तारू यांच्या निलंबनानंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर तारु यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाशी संबंध असलेल्या मुख्य सूत्रधार असलेल्या शितल तेजवानीची चौकशी सुरु होती. दरम्यान, बुधवारी दुपारी तेजवानीना पोलिसांनी अटक केली.

land fraud
BJP internal conflict news: बावनकुळे-सुलेखा कुंभारे यांच्यातील वाद कशामुळे? भाजपमध्ये उलटसुलट चर्चा

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीन या देशामध्ये आयोजित करण्यात आला आहे. हा विवाह सोहळा 4ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत बहरीन येथे होणार आहे. या लग्नाला जायचे आहे, त्यामुळे लग्नाहून परत आल्यानंतर उर्वरित चौकशी करा, अशी विनंती दिग्विजय पाटील यांनी पोलिसांना केली आहे. दिग्विजय पाटील यांनी पोलसांकडे केलेल्या या मागणीला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी (Anajli Damniya) विरोध केला आहे.

land fraud
NCP Sharad Pawar : पुणे जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 'नो इंटरेस्ट'; 'तुतारी'वाला माणूस मतपत्रिकेवरून गायब?

दमानिया यांनी वारंवार या संपूर्ण जमीन घोटाळ्याची निःपक्षपाती चौकशी व्हावी आणि संबंधित सर्व आरोपींवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी केलेली आहे. आरोपीला अशा परिस्थितीत लग्नासाठी जाण्याची परवानगी दिल्यास, त्याचा तपासावर परिणाम करू शकतो, अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे अंजली दमानियांनी विरोध केला आहे.

land fraud
Congress Thackeray Alliance : राजकारणातील आजची सर्वात मोठी बातमी; काँग्रेसच्या देशपातळीवरील मातब्बर नेत्याचे ठाकरेंशी गुफ्तगू, मनसेवर फैसला?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com