Jayant Patil News : जयंत पाटलांनी काढला पोलिसांना चिमटा, म्हणाले..!

Supriya Sule said that I am the grand daughter of Sharadabai Pawar: मी शारदाबाई पवारांची नात, मला रडायला नाही, तर लढायला शिकवलं आहे..
Jayant Patil
Jayant Patil sarkarnama
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीसाठी आज महाविकास आघाडीच्या बारामती, शिरूर तसेच पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. बारामतीमधून खासदार सुप्रिया सुळे, शिरूरमधून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी तर पुणे शहर लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी आपला अर्ज भरला.

या वेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आपल्या या तीन उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली. या सभेदरम्यान तीनही उमेदवार व्यासपीठावरून खाली येऊन समोर मतदारांमध्ये बसले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाषण सुरू होते. त्यावरून पाटील यांनी पोलिसांना चिमटा काढला.

पोलिसांनी आमच्यासाठी छोट्या जागेची व्यवस्था केली. पदोपदी आमच्यावर होणारा अन्याय हे आम्हाला सांगणं आवश्यक आहे. तीन पक्षाचे कार्यकर्ते येथे आलेले आहेत. त्यामुळे एखाद्या मोठ्या रस्त्यावर जागा दिली असती तर बरं झालं असतं. पण, इथं बसायलाच जागा नाही. पोलिसांचा दृष्टिकोन कसा अन्यायकारक आहे, हे तुम्ही सिद्ध केलंय. पण, ठीक आहे, दिवस बदलत असतात लक्षात ठेवा, असा पोलिसांना चिमटा पाटील यांनी काढला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jayant Patil
Loksabha Election : 'एकही शब्द वाईट बोलले नाही...' सुनेत्रा पवारांचा रोख कुणाकडे?

या सभेत बारामतीच्या (Baramati) खासदार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यावर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, मला म्हणतात हे रडत बसतील. पण, लक्षात ठेवा, शारदाबाई पवारांची नात आहे मी, रडत बसणारी नाही. त्यांनी मला लढायला शिकवलं आहे, रडायला नाही, अशा शब्दांत सुळे यांनी दादा-वहिनीवर टीका केली. मी दहा वर्षे निधी आणला नाही, अशी टीका केली जाते. मी त्यांना माझा कार्य अहवाल चांगलं पॅकिंग करूनच पाठविणार आहे. तो अहवाल मराठीतदेखील आहे, असा टोलाही सुळे यांनी अजित पवारांना लगावला. तसेच, त्यांनी माझा कार्य अहवाल वाचला तर ते सर्व मलाचं मतदान करतील, असेही त्या म्हणाल्या.

तुतारी सर्व शुभकार्यासाठी असते. त्यामुळे निवडणुकीसाठी हे चिन्ह मिळाल्याचे विशेष आनंद असल्याचे खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध पुकारलं तेव्हाही तुतारीच वाजली होती. आम्हीदेखील तुतारी फुंकून विरोधकांचा पराभव करणार आहोत. आपल्याला ही तुतारी रवींद्र धंगेकर यांच्या हाती द्यायची आहे. शाहू-फुले-आंबेडकर, जितेगा धंगेकर.. अशी घोषणादेखील या वेळी सुप्रिया सुळेंनी दिली.

Jayant Patil
Baramati Lok Sabha Constituency: बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून प्रचारप्रमुखांची नावे जाहीर!

या वेळी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर निशाणा साधत विकासाचे मुद्दे नसल्याने विरोधक वैयक्तिक टीका करत असल्याचा आरोप कोल्हे यांनी केला. मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात प्रत्येकवेळी संसदेत आवाज उठवित शेतकरी, सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढा दिल्याचे त्यांनी सांगितले.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com