Jayant Patil Vs Ajit Pawar : पिंपरी-चिंचवडमध्ये अजितदादांना जयंत पाटील देणार धक्का? असा आहे 'प्लॅन'...

Pimpri Chinchwad NCP : राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांसह जयंत पाटलांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची भेट
Jayant Patil in Pimpri Chinchwad
Jayant Patil in Pimpri ChinchwadSarkarnama
Published on
Updated on

Pune Political News : पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि आमदार रोहित पवार यांनी दमदार एन्ट्री केली आहे. यानंतर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही अजित पवारांच्या या बालेकिल्ल्यात जातीने लक्ष घातले आहे. गणेशोत्सवानिमित्त त्यांनी बुधवारी रात्री उशिरा अचानक शहराचा दौरा केला. त्यात सध्या तटस्थ असलेल्या माजी महापौर आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या मंगला कदम यांच्यासह भाजपचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गणेश दर्शनानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या पाटलांनी राष्ट्रवादीसह भाजपच्या नेत्यांची भेट घेतल्याने चर्चा सुरू झाली आहे. (Latest Political News)

अजितदादांचा वीक पाॅइंट असलेल्या उद्योगनगरीकडे लक्ष दिले, तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष खेचता येईल, हा गेम प्लॅन आता चाणाक्ष जयंत पाटलांनी खेळायचे ठरवले आहे. यातून त्यांनी अजितदादांना मॅनेज होणार नाही, असा शहराध्यक्ष तुषार कामठे या भाजपच्या माजी तरुण नगरसेवकाच्या रूपाने दिला. त्यानंतर शहरात पक्षबांधणीची जबाबदारी रोहित पवार (Rohit Pawar) या आपल्या अभ्यासू आमदारावर सोपवली. त्याजोडीने तेही स्वतः लक्ष घालत आहेत.

Jayant Patil in Pimpri Chinchwad
Sunil Shelke Vs Dilip Mohite : पवनानंतर मावळात जाधववाडी धरणाचे पाणी पेटणार!आमदार सुनील शेळके-दिलीप मोहिते भिडणार

शहरात एक मध्यवर्ती कार्यालय करण्याऐवजी त्यासह पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशी विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालये असणार आहेत. कार्यालयांच्या उदघाटनांवेळी ते जाहीर सभा घेणार आहेत. त्यावेळी अनेकांची घरवापसी होण्याची शक्यता आहे. त्या तयारीसाठीच बुधवारी रात्री उशीरा पाटलांनी शहर दौरा केला.

गणेशोत्सव आणि नव्या अध्यक्षांना ताकद देण्यासाठी ते आले होते, असे राष्ट्रवादीचे पक्षाचे शहर प्रवक्ते माधव पाटील यांनी `सरकारनामा`ला सांगितले. शहरातील कचरा, वाहतूक कोंडी, नदी प्रदूषण आदी शहरातील प्रश्न त्यांनी समजावून घेतले, असे ते म्हणाले. (Maharashtra Political News)

जयंत पाटील (Jayant Patil) बुधवारी रात्री दहा वाजता शहरात दाखल झाले. रात्री दोन वाजेपर्यंत त्यांच्या भेटीगाठी आणि काही सार्वजनिक गणेश मंडळाचे दर्शन सुरु होते. कामठेंसह प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश म्हस्के, माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, गणेश भोंडवे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहराध्यक्षा ज्योती निंबाळकर, मुख्य प्रवक्ते माधव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजन नायर, कष्टकरी नेते काशिनाथ नखाते, देवेंद्र तायडे, विशाल जाधव, प्रशांत सपकाळ आदी त्यांच्यासोबत होते. अडीच वाजता ते मुंबईला रवाना झाले. त्यांच्या पक्ष कार्यालये उदघाटनाच्या पुढील दौऱ्यानंतर पुढील महिन्यातच शरद पवारांचा शहरात मेळावा होणार आहे, असे कामठेंनी सांगितले.

Jayant Patil in Pimpri Chinchwad
Ghodganga Sugar Factory : घोडगंगा साखर कारखाना यंदा सुरू होणार का? शिवाजीराव काळेंच्या शंकांचे कारण काय?

दरम्यान, या दौऱ्यात कदम आणि वाघेरे यांची पाटील यांनी घेतलेल्या भेटीची मोठी चर्चा झाली. वाघेरे हे लोकसभेला मावळमधून लढण्यास इच्छूक आहेत. निवडूनही येऊ, असा दावा त्यांनी या भेटीनंतर `सरकारनामा`शी बोलताना केला. 'पाटील यांनी माझी माहिती घेतली. तसेच नगरसेवकपदाच्या पहिल्याच टर्ममध्ये आमदार, खासदाराच्या तोडीची कामे केल्याची पावती दिली,' असे वाघेरे म्हणाले.

'आमच्या भागातील गणेश मंडळाच्या दर्शनासाठी आल्य़ानंतर रात्री ११ वाजता पाटलांचा फोन आला, चहाला यायचंय, येऊ का, अशी त्यांनी विचारणा केली आणि ते आले,' असे कदम या भेटीवर बोलताना म्हणाल्या. यावेळी कसलीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. 'आमचा पक्ष फुटलेलाच नसल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केल्याने कुठल्या गटात जाणार याचा प्रश्नच उदभवत नाही,' असेही त्या म्हणाल्या.

(Edited by Sunil Dhumal)

Jayant Patil in Pimpri Chinchwad
M. S. Swaminathan Passed Away : हरित क्रांतीचे जनक स्वामिनाथन यांचे निधन; वयाच्या 98 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com