Nitesh Rane : राणेंना आता जेजुरीतूनच झटका; ‘आमच्या भावना दुखावल्यात, मल्हार सर्टिफिकेशनचे नाव बदला; अन्यथा...’, नागरिक आक्रमक

Malhar certification : मंत्री नीतेश राणे यांनी या योजनेचे नाव न बदलल्यास गाव बंद आंदोलन, उपोषण करण्याचा इशाराही जेजुरी ग्रामस्थांनी दिला आहे. आता नीतेश राणे मल्हार सर्टिफिकेटचे नाव बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama
Published on
Updated on

Jejuri, 23 March : राज्याचे मत्स्य, बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी मटन विक्रीसंदर्भात एक नियमावली तयार करून झटका पद्धतीचे मटन विकणाऱ्यास मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा केली होती. त्याला आता जेजुरी ग्रामस्थांनी बैठक घेऊन तीव्र विरोध दर्शविला आहे. राणेंच्या या घोषणेमुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत, असे सांगून या सर्टिफिकेटला पाठिंबा देणाऱ्या जेजुरी देवसंस्थान विश्वस्तांचाही गावकऱ्यांनी समाचार घेतला.

झटका पद्धतीचे मटन विकणाऱ्यास मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा नीतेश राणे यांनी केल्यानंतर जेजुरीतील (Jejuri) खंडोबा देवसंस्थानच्या काही विश्वस्तांनी त्याला पाठिंबा दिला होता. मात्र, एका विश्वस्ताने मात्र विरोध केला होता. त्याचा जेजुरीच्या नागरिकांनी छत्री मंदिर परिसरात झालेल्या सभेत निषेध केला. ग्रामस्थांशी चर्चा न करताच मार्तंड देवसंस्थानच्या काही विश्वस्तांनी मल्हार सर्टिफिकेशनला आपला पाठिंबा दर्शविला होता. राजकीय सोयीसाठी हे विश्वस्त देवाची बदनामी करत आहेत, असा हल्ला गावकऱ्यांनी त्यांच्यावर केला.

हलाल पद्धतीचे मटन विक्री करणाऱ्यास विरोध दर्शविताना नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी झटका पद्धतीने मटन विक्री करणाऱ्यास प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली होती. मात्र, पहिल्यांदा नाशिक हिंदू खाटीक समाजाने त्याला प्रचंड विरोध केला. त्यानंतर शनिवारी (ता. २२ मार्च) जेजुरी ग्रामस्थांनी छत्री मंदिर परिसरात सभा घेतली. त्या सभेत मल्हार सर्टिफिकेटला विरोध दर्शविण्यात आला.

Nitesh Rane
Ram Shinde : ‘बालपणी मी अतिशय खोडकर होतो’; मामाच्या गावी आलेले सभापती राम शिंदेंनी बोलून दाखवली ‘ती’ खंत!

खंडोबा हा शंकराचा अवतार असून राज्याचे कुलदैवत आहे. मटणासारख्या प्रकाराला मल्हार नाव देणे, हे भाविकांच्या भावना दुखावणारे आहे, ते नाव तातडीने बदलण्यात यावे. राणे यांनी एखाद्या सरकारी योजनेला मल्हार नाव दिले असते आम्ही गावकऱ्यांनी त्याचे स्वागत केले असते. मात्र, मटना विक्रीसारख्या प्रकाराला मल्हार नाव देणे चुकीचे असून भावना दुखावणारे आहे, असा पुनरुच्चारही गावकऱ्यांनी केला.

मंत्री नीतेश राणे यांनी या योजनेचे नाव न बदलल्यास गाव बंद आंदोलन, उपोषण करण्याचा इशाराही जेजुरी ग्रामस्थांनी दिला आहे. आता नीतेश राणे मल्हार सर्टिफिकेटचे नाव बदलणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Nitesh Rane
Babasaheb Deshmukh : सत्तेच्या जवळ गेलेले बाबासाहेब देशमुखांवर आमदार खरेंचा हल्ला; ‘देशमुख आता बहुजन, धनगर समाजाचे नेते राहिले नाहीत, ते ब्राह्मणांचे नेते झालेत’

दरम्यान, यापूर्वी नाशिक शहरातील सर्व मटन व्यावसायिकांनी हलाल पद्धतीचे मटन विकले जाईल, झटका पद्धतीचे मटन आम्ही कोणीही विकणार नाही, असा निर्णय घेतला आहे. याशिवाय ‘आम्ही जन्मजात खाटीक आहोत. खाटीक व्यवसाय आमचा आजचा नाही, तर तो हजारो वर्षांपूर्वीपासूनचा आहे, त्यामुळे आम्हाला सर्टिफिकेट देणारे नीतेश राणे कोण? असा सवालही नाशिकच्या हिंदू खाटीक समाजातील मटन विक्रेत्यांनी केला हेाता.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com