Pune News: पुणेकरांना बजेटमध्ये काय मिळालं? दोन प्रकल्पांसाठी मोठी घोषणा

Union Budget 2025: पुणे शहरातील मुळा -मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी (जायका) अर्थसंकल्पात २२९ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
union budget 2025
union budget 2025Sarkarnama
Published on
Updated on

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी सादर केलेल्या देशाच्या अर्थसंकल्पातून (Budget 2025) सर्वसामान्य व नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रात पुणे, मुंबईसह विविध ठिकाणी अनेक प्रकल्पातून हजारो कोटींचा निधी मिळाला आहे. महामेट्रो आणि जायका प्रोजेक्टला बुस्टर डोस मिळाला आहे. या दोन्ही प्रकल्पांना गती मिळणार आहे.

महामेट्रोच्या स्वारगेट ते कात्रज आणि पिंपरी ते निगडी या विस्तारित मार्गांच्या कामांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात ६९९.१३ कोटी आणि शहरातून वाहणाऱ्या मुळा-मुठा नदी संवर्धनासाठी हाती घेतलेल्या जायका प्रकल्पाकरिता २९९.९४ कोटी असे एकूण ९२९.७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

union budget 2025
Delhi Assembly Elections : दिल्ली विधानसभा लढण्यासाठी युवकांनी फिरवली पाठ; ज्येष्ठ उमेदवारांची संख्या वाढली!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर करताना केलेल्या निधीच्या घोषणेमुळे 'जायका' प्रकल्पाच्या कामास आणखी गती मिळणार आहे. पुणे शहरातील मुळा -मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्पाच्या मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी (जायका) अर्थसंकल्पात २२९ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहीतेमुळे महापालिकेस निधी मिळण्यास विलंब झाला होता. तांत्रिक अडचणी, आणि निवडणुकांमुळे परप्रांतीय कामगारांच्या सुट्ट्या अशा विविध कारणांमुळे प्रकल्पाच्या कामे थंडावण्याच्या स्थितीत होते. आता या निधीमुळे त्याचे काम गतीने सुरु होण्याची शक्यता आहे.

union budget 2025
Beed Crime : बीडमध्ये मोठी कारवाई; शस्त्र परवाना रद्दचा आकडा 183 वर पोचला, अजून कारवाईचे संकेत

या प्रकल्पाअंतर्गत महापालिकेकडून वडगाव, वारजे, मुंढवा, हडपसर (मत्सबीज केंद्र), खराडी, भैरोबानाला, नायडू रुग्णालय, धानोरी, बाणेर व नरवीर तानाजी वाडी या मैलापाणी शुद्धीकरण केंद्रांची (एसटीपी) कामे सध्या सुरु आहेत. तर बॉटनिकल गार्डन येथील "एसटीपी' केंद्राची जागा अद्यापही महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही.

केंद्र सरकारमार्फत जपान इंटरनॅशनल को -ऑपरेशन एजन्सीच्या (जायका) आर्थिक सहकार्यातून आणि राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत मुळा-मुठा नदी प्रदुषण नियंत्रण प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत नद्यांमध्ये सोडल्या जाणाऱ्या मैलापाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (एसटीपी) उभारणीचा महत्वाकांक्षी प्रकल्प शहरात राबविला जात आहे.

एनव्हायरो कंट्रोल-तोशिबा वॉटर सोल्युशन जेव्ही'यांना ३ मार्च २०२२ रोजी कार्यादेश काढुन प्रकल्पाच्या कामाला सुरवात करण्यात आली. केंद्र सरकारकडून ८४१.७२ कोटी ( ८५ टक्के) रुपयांचे अनुदान, तर पुणे महापालिकेकडुन १४८.५४ ( १५ टक्के) हिस्सा अशी एकुण ९९० कोटी रुपये खर्च करुन संबंधित प्रकल्प मार्गी लागणार आहे.

जायका

  • आत्तापर्यंत या प्रकल्पाच्या कामासाठी ५४१.२३ कोटी रुपये इतका खर्च आला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडुन आत्तापर्यंत ३५०.४५ कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे.

  • प्रकल्पाच्या कामासाठी महापालिका प्रशासनाने २०२४-२५ या वर्षाअंतर्गत ३४३ कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यानुसार, मागील वर्षी ११३ कोटी रुपये महापालिकेला मिळाले आहेत.

  • सीतारमन यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी या प्रकल्पासाठी २२९ कोटी रुपयांची घोषणा केली. हा निधी महापालिकेला लवकर मिळाल्यास प्रकल्पाच्या कामास अधिक गती मिळण्याची शक्‍यता आहे.

मेट्रो

  • वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट अशा दोन मेट्रो मार्गांची उर्वरित कामे आणि पिंपरी ते निगडी, स्वारगेट ते कात्रज या दोन विस्तारित मार्गांच्या निधीसाठी महामेट्रोने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता.

  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात पुणे मेट्रोसाठी ६९९.१३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.या निधीतून मेट्रो सेवा सुरू झालेल्या दोन मार्गांवरील उर्वरित कामे व दोन विस्तारित मार्गांची कामे केली जाणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com