Lok Sabha Election: ...म्हणून विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका, अजितदादांची पदाधिकाऱ्यांना तंबी

Ajit Pawar News: विकासाची वज्रमूठ बांधून आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान (PM Modi) करायचं आहे. ही निवडणूक विकासाची आहे. विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातील घटना दुरुस्तीवर भाष्य करत आहेत. ते नको ते मुद्दे उचलत आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maval Lok Sabha Election: राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) महायुतीने प्रचार सभांचा धडाका लावला आहे. प्रचार सभांमधून नेते आपल्या कार्यकर्त्यांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. परंतु सध्याची निवडणूक ही युती आणि आघाड्यांमध्ये आहे. त्यामुळे कालपर्यंत आपल्या पक्षात असणारा नेता विरोधी पक्षात गेल्यामुळे कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

अशातच आता कितीही जवळचा उमेदवार असला तरी तो विरोधक आहे. त्यामुळे विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका, अशी तंबीच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे. ते मावळ लोकसभेत (Maval Lok Sabha) आयोजित केलेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीत बोलत होते.

या बैठकीत अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, विकासाची वज्रमूठ बांधून आपल्याला नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पंतप्रधान करायचं आहे. ही निवडणूक विकासाची आहे. विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळातील घटना दुरुस्तीवर भाष्य करत आहे. ते नको ते मुद्दे उचलत आहेत. परंतु त्याला काही अर्थ नाही. इंदिरा गांधींनी (Indira Gandhi) तब्बल 28 वेळा घटना दुरुस्ती केली आहे, तर मोदींनी केवळ 6 वेळा दुरुस्ती केली आहे. त्यामुळे घटना दुरुस्ती आणि बदल समजून घ्या, असंही पवार या वेळी म्हणाले.

Ajit Pawar
Maval Lok Sabha Constituency : शिवसेनेच्या राऊतांना काँग्रेसच्या कदमांनी घेतले शिंगावर म्हणाले...!

विरोधी उमेदवारांना भेटू नका

प्रचारादरम्यान विरोधी उमेदवाराला भेटायला जाऊ नका, पुन्हा म्हणाल फक्त गप्पा मारायला गेलो होतो. मी तसलं काही ऐकून घेणार नाही. आपली महायुती आहे, युतीधर्म पाळायला हवा. मैत्री, नाती-गोती, भावकी हे सर्व बाजूला ठेवा. ही निवडणूक देशाची आहे, अशी तंबीच दादांनी पदाधिकाऱ्यांनी दिली. तसेच विरोधी उमेदवार असं सांगेल की, अजितदादांनी मला उभं राहायला सांगितलं आहे. पण असं अजिबात नाही. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मी असलं काही करत नाही. आपले उमेदवार श्रीरंग बारणे (Srirang Barne) आहेत. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका.

Ajit Pawar
MP Amol Kolhe On Dilip Mohite : कोल्हेंचा मोहितेंना सवाल, 'चहाचं सोडा दुधाचं काय ते बोला'!

...तर भारत जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश होईल

विकासाची वज्रमूठ बांधून नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे. ही निवडणूक विचारांची नाही तर विकासाची आहे. विरोधक प्रत्येक महिलांच्या खात्यात 1 लाख टाकायची गॅरंटी द्या म्हणतात. देशात 70 कोटी महिला आहेत, असं केलं तर भारत जगातील सर्वाधिक कर्जबाजारी देश होईल. विरोधक बोलायचं म्हणून काहीही बोलत असतात, अशी टीका अजित पवारांनी विरोधकांवर केली.

(Edited By Jagdish Patil)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com