Pune Police : पोर्श अपघात प्रकरणात पुणे पोलिसांना धक्का, अगरवालांच्या चिरंजीवाला मोठा दिलासा

Kalyani Nagar Accident : देशभर गाजलेल्या कल्याणीनगर येथील पोर्श कार अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
Porsche Car Accident Case
Porsche Car Accident CaseSarkarnama
Published on
Updated on

Kalyani Nagar Accident : देशभर गाजलेल्या कल्याणीनगर येथील पोर्श कार अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाला सज्ञान म्हणून समजून खटला चालवण्यात यावा अशी मागणी करणारा पुणे पोलिसांचा अर्ज बाल न्याय मंडळाने फेटाळला आहे. त्यामुळे आरोपी तरुणाला अल्पवयीन म्हणूनच धरले जाणार असल्याचं स्पष्ट झाले आहे.

निर्भया प्रकरणानंतर गंभीर गुन्ह्यांमध्ये 16 वर्षांवरील अल्पवयीन मुलांना सज्ञान समजून खटला चालवता येतो. मात्र, त्यासाठी बाल न्यायमंडळाची परवानगी घ्यावी लागते. असं उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यानुसार, विशाल अगरवाल यांच्या 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाला सज्ञान म्हणून समजून खटला चालवण्यात यावा, अशी मागणी पोलिसांनी केली होती.

19 मे 2024 मध्ये कल्याणीनगर भागात रात्री एका भरधाव पोर्शे गाडीने एक तरुण आणि एका तरुणीला धडक दिली होती. यात दोघांचाही मृत्यू झाला होता. ही पोर्श कार प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल (Vishal Agarwal) यांचा 17 वर्षाचा अल्पवयीन मुलगा चालवित असल्याचे समोर आले होते. बार आणि पब मध्ये पार्टी करून मोठ्या प्रमाणात मद्यपान करून अल्पवयीन मुलगा ही कार चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या नागरिकांनी सांगितले होते.

Porsche Car Accident Case
Pune तील FC Road वर खरंच Love Jihad चालतो का? मुली सुरक्षित आहेत का? Gopichand Padalkar News

या अपघातानंतर गाडी चालवणाऱ्या या तरुणाला बाहेर काढून नागरिकांनी चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पण त्यानंतर या मुलाला वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. पोलिसांनी अटक केल्यानंतर लगेच मेडिकलसाठी नेण्याऐवजी सकाळी आठ वाजता मेडिकलला नेले. त्यामुळे त्याने मद्यपान केलेले की नाही? हे मेडिकली सिद्ध होऊ शकले नाही. याशिवाय ससून रुग्णालयातही मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले.

Porsche Car Accident Case
Pune Congress : पुण्यात काँग्रेसला तिसरा झटका... थोपटे, धंगेकरांनंतर आणखी एका माजी आमदाराचा रामराम निश्चित!

अपघाताच्या रात्री वडगाव शेरीचे तत्कालीन आमदार सुनील टिंगरे हेही पोलिस स्टेशनला गेले होते. बिल्डर विशाल अगरवाल हे आमदार टिंगर यांचे मित्र असल्याने आणि संबंधित मुलाला वाचविण्यासाठी ते तिकडे गेल्याचा आरोप झाला. त्यानंतर बाल न्याय मंडळानेही मुलाला केवळ 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देऊन सोडून दिले. यामुळेही बाल न्याय मंडळावर मोठी टीका झाली. आता याच बाल न्याय मंडळाने संबंधित आरोपी मुलाला सज्ञान समजून खटला चालविण्याची परवानगी नाकारली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com