Pune News, 10 Jul : पुणे जिल्हा आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी आणि काँग्रेसला जोरदार धक्का बसणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे माजी आमदार असलेला एक नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
एकेकाळी पुणे जिल्ह्यावर काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र आता त्यांचा एक एक शिलेदार निखळताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार असलेल्या संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर देखील शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले.
त्यानंतर आता पुरंदर तालुक्याचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर जगताप काँग्रेसमध्ये अस्वस्थ असल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वी ते भोर, राजगड, मुळशी विधानसभेचे माजी आमदार संग्राम थोपटेंच्या सोबतच त्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याच्या देखील चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्यावेळी स्थानिक भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केल्याचं देखील सांगितलं जातं. त्यामुळे तो प्रवेश होऊ शकला नाही असं बोललं जातं.
पुरंदर तालुक्यातील काँग्रेस पक्षावर माजी आमदार संजय जगताप यांच्या कुटुंबियांची मजबूत पकड आहे. त्यामुळे त्यांनी जर काँग्रेसची साथ सोडला तर तो काँग्रेससाठी मोठा धक्का असू ठरू शकतो. सध्या राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती सत्तेत आहे.
तसेच तालुक्यात विजय शिवतारेंना उघडपणे शह देणारे भाजपमध्ये फारसे कोणी उत्सुक नाही. मात्र, संजय जगताप भाजपमध्ये आल्यास विजय शिवतारेंना मोठा शह बसणार आहे. तसेच जगताप यांचा भाजप प्रवेश झाल्यास येत्या काही दिवसांत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका यांच्या निवडणुका येत असून संजय जगताप यांच्या माध्यमातून अनेक वर्षे पुरंदर तालुक्यात सत्तेची स्वप्ने पाहणार्या भाजपला मोठा फायदा होऊ शकतो.
गेल्या काही काळापासून पुणे जिल्ह्यातील आपलं वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात भाजप असल्याचा पाहायला मिळत आहे. यातूनच संग्राम थोपटे यांचा देखील प्रवेश घडून आणण्यात आला. त्यानंतर आता पुरंदर तालुक्यातील नगरपालिका, पंचायत समिती.
यासह जिल्हा परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भाजपला जगताप यांच्या मदतीने प्रवेश मिळण्याची संधी निर्माण होणार आहे. दरम्यान, याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष शेखर वडणेकर यांनी आपल्याला पक्षातून याबाबत कोणतीही कल्पना अथवा सूचना मिळाली नसल्याचं सांगितलं आहे. तर संजय जगताप यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो देखील होऊ शकला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.