Chinchwad : ठाकरे गटाच्या शहरप्रमुखावरील हल्ल्याला २०१७ च्या महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी

BJP vs Thackeray : भाजपच्या तक्रारीनंतर आता परस्परविरोधी गुन्हा दाखल
Sachin Bhosale
Sachin BhosaleSarkarnama
Published on
Updated on

Sachin Bhosale : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना ठाकरे गटाचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांच्यावर बुधवारी (ता. २२) हल्ला झाला. तो २०१७ मधील पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून आता परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आल्या आहेत.

भाजपकडूनही तक्रार आल्याने वाकड पोलिसांनी (Police) भोसलेंविरोधात आज गुन्हा दाखल केला. भोसलेंनी दिलेल्या तक्रारीनंतर भाजपच्या एका कार्यकर्त्यानेही भोसलेंविरोधात तक्रार दिली आहे. त्यात त्यांनी भोसलेंनीही आपल्याला मारहाण केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर या प्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

Sachin Bhosale
Kasba By-Election : ब्राह्मण समाजाच्या नाराजीच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत; फडणवीसांचा आरोप !

PCMC पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत माने हे भोसलेंचे प्रभाग २४ मध्ये (थेरगाव) प्रतिस्पर्धी उमेदवार होते. त्यावेळी मानेंचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांची भोसलेंवर मोठी खुन्नस होती. त्यातूनच काल चिंचवडच्या पोटनिवडणुकीत भोसलेंवर माने व त्याच्या चार साथीदारांनी हल्ला केला. यात भोसले जखमी झाले आहेत.

Sachin Bhosale
Uddhav Thackeray : चोरलेला धनुष्यबाण घेऊन पोटनिवडणुकीत या; आम्ही मशाल घेऊन येतो, ठाकरेंचे शिंदे-फडणवीसांना आव्हान!

दरम्यान, भोसलेंच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मात्र मुख्य आरोपी जयदीप माने व इतर दोन आरोपींना अटक झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ आज माजी नगरसेवक अनंत कोराळेंनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. यावेळी फरार आरोपींना पकडण्याची मागणी करण्यात आली.

Sachin Bhosale
Sanjay Shirsat News : ठाकरे गटाची बाजू लंगडी, म्हणूनच सिब्बल यांचे भावनिक आवाहन..

भोसलेंना संरक्षण देण्याची गोऱ्हेंची मागणी

भोसलेंच्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी. आरोपींवर कडक कारवाई करावी, तसेच भोसलेंना पोलीस संरक्षण द्यावे, अशी सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना आज केली आहे. पुणे व पिंपरी चिंचवडमधील वाढत्या संघटित गुन्हेगारीस आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आवर घालण्याची निकड असल्याचेही पत्रात म्हटले. दरम्यान, गोऱ्हे यांनी सचिन भोसलेंची त्यांनी विचारपूस केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com