Pune News: कसबा पेठ विधानसभेतील (Kasba Peth Assembly election 2024) काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या हिंदमाता प्रतिष्ठानकडून दिवाळी सरंजाम वाटप करणारा टेम्पो निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने व काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पकडला. आचारसंहिता लागू असताना देखील आमदारांचा फोटो असलेल्या बॅगमधून हा दिवाळी सरंजाम वाटला जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला.
यानंतर निवडणूक आयोगाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून रविवारी रात्री उशिरा रविंद्र धंगेकर तसेच हिंदमाता प्रतिष्ठानच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याबाबत निवडणूक आयोगातील अधिकारी स्वामीनंद पोतदार यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
टेम्पो चालक तुषार अशोक अंदे तसेच आमदार रविंद्र धंगेकर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यानंतर अद्याप मी निवडणुकी उतरलो नसताना देखील विरोधकांच्या मनात धडकी भरल्याने विरोधकांकडून माझ्या विरोधात कट कारस्थान सुरू असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला.
आमदारावर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेसने देखील ॲक्टिव मोडमध्ये येऊन रेशन दुकानांमध्ये आचारसंहिता भंगाचे प्रकार सुरू असल्याची तक्रार निवडणूक आयोग अधिकार्याकडे दिली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आचार संहिता लागू झाली आहे. सध्या रेशनिंग दुकानातून शिधापत्रिकाधारकांना दिवाळीचा गोड शिधा वाटप चालू आहे. हा शिधा देण्यासाठी ज्या पिशव्या वापरण्यात आल्या आहेत त्या पिशव्यांवरती भारताचे पंतप्रधान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आदींचे फोटो छापलेले असून त्यांची जाहिरातबाजी चालू आहे. आचार संहितेच्या काळात अशी जाहिराबाजी करून तीचा भंग केला जात आहे. अशी तक्रार काँग्रेस पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिली आहे.
शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज काँग्रेसच्या शिष्ट मंडळाने मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटी दरम्यान रेशनिंग दुकानातून गोड शिधा वाटपाच्या पिशव्यांवर छापण्यात आलेले फोटो व त्यांची जाहिरात या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्वरीत रेशनिंग दुकानदारांना आदेश देवून हे थांबविले पाहिजे व जाहिरात केल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याबाबत संबंधितांवर त्वरीत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करून निवेदन दिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.