
Khed Alanadi Assembly : खेड-आळंदी मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार बाबाजी काळे यांच्या आमदारकीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना बाबाजी काळे यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली, असा आरोप करत त्यांचे प्रतिस्पर्धी माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावेळी काळे यांची आमदारकी रद्द होईल आणि खेड आळंदी मतदारसंघात पोटनिवडणूक होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याबाबत बोलताना दिलीप मोहिते म्हणाले, काळेंना अर्थसंकल्पातून तालुक्यासाठी निधी आणता आला नाही. आपण आमदार असताना मंजूर केलेल्या कामांचीच ते भूमिपूजने करीत आहेत. माझीच कामे लोकांपुढे मांडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. भामा आसखेड आणि चासकमान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पूल, बुडीत बंधारे मी मंजूर करून आणले होते. आता हे लोकांना सांगत आहेत. महसूल, पोलिस खात्यात भ्रष्टाचार बोकाळला आहे. पाईट रस्त्यावरील पुलाचे काम आमदारांचा पूर्वीचा भागीदार असलेल्या ठेकेदाराने घेतले आहे, असाही दावा त्यांनी केला.
खेड तालुका खरेदी विक्री संघावर दोनच स्वीकृत संचालक घेण्याचा नियम आहे. मात्र संचालक मंडळाने 10 जणांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड केली आहे. सहकारी ऑइल मिलमधून एक डबाही तेल आजपर्यंत निघालेले नाही. सहकारी मुद्रणालय कुठे आहे, कोणाला माहीत नाही. अप्पासाहेब सातकरांच्या नावाने काढलेली पतसंस्था चालली नाही, अशी टीकाही मोहिते यांनी केली. दरम्यान, मोहिते यांनी केलेल्या आरोपांबाबत स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन प्रत्त्युत्तर देईन, असे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.