CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisSarkarnama

Devendra Fadnavis : पार्थ पवारांवर कारवाई होणार का? CM फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, 'अजितदादाही माझ्या मताशी सहमत...'

Pune Park Land Scam : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.
Published on

Pune Koregaon Park Land Scam : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे.

या प्रकरणी दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करण्याबाबत अर्ज केला आहे. मात्र, असं झालं तरी जे गुन्हेगारी प्रकरण दाखल झाले आहे, ते संपणार नाही, असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

शिवाय या प्रकरणी अजित पवारांचे चिरंजीव पार्थ यांच्यावर कारवाई केली जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यावर फडणवीसांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले या प्रकरणाचा जो चौकशी अहवाल येईल त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

CM Devendra Fadnavis
NCP News : चाकणकर यांच्या विरोधातील आंदोलन भोवलं; रुपाली ठोंबरेंवर पक्षाची अ‍ॅक्शन; 7 दिवसांचा अल्टिमेटम

जमीन व्यवहार प्रकरणी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'माझ्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, हा जो करार त्यांनी केला होता. त्यामध्ये पैशाचे देवाणघेवाण बाकी होती, पण रजिस्ट्री पूर्ण झाली होती. आता दोन्ही पक्षांनी ही रजिस्ट्री रद्द करण्याबाबत अर्ज केला आहे.

त्या अर्जाच्या अनुषंगाने त्यांना रजिस्ट्री रद्द करायची असेल तरी देखील पैसे भरावे लागतात. त्या संदर्भातील नोटीस त्यांना पाठवण्यात आली आहे. रजिस्ट्री रद्द झाली तरी जी क्रिमीनल केस दाखल झाली आहे, ती संपणार नाही. या प्रकरणात ज्या अनियमितता आहेत, त्याला जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर पुढील कारवाई होईल.

CM Devendra Fadnavis
Ajit Pawar : अजित पवार, भुजबळांनी मराठा पोर्टल बंद पाडले : समाजाचे नुकसान, आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षांचा आरोप

दरम्यान, यावेळी पत्रकारांनी पार्थ पवारांवर कारवाई होणार का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, 'असं आहे की आता आधी अहवाल येऊ दिला पाहिजे. अहवालात जो कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल आणि माझ्या या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही सहमत असतील. त्यामुळे अहवालात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होईल.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com