Mumbai: मुंबईतील शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर सहा दिवसांपूर्वी जोरदार राडा झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अद्यापही ठाकरे गटाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल होण्याचे सत्र सुरूच आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या राड्याप्रकरणी ठाकरे गटाच्या चौघांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. विभाग प्रमुख महेश सावंत यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गटाच्या एका महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंसह इतरांवर डिलाईल रोड ब्रीजचे अनधिकृत उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते शरद कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
16 नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे दादर परिसरात होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री,आमदार सदा सरवणकर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के, शीतल म्हात्रे आदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी दाखल झाले. स्मृतिस्थळाला वंदन करून मुख्यमंत्री तेथून निघून गेले. मात्र, नरेश म्हस्के व शीतल म्हात्रे तेथेच होते. त्यानंतर काही वेळाने शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी केल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. मात्र, ठाकरे गटाकडून हा आरोप फेटाळण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.