सचिन वाघमारे-
Pune News : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर पुणे पोलिसांनी एका ड्रग्जच्या खटल्यात ललित पाटीलला अटक केली. त्यानंतर ललित कोणाला भेटला व कोठे गेला, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दुसरीकडे गेल्या तीन वर्षांपासून ललित पाटील येरवडा जेलमध्ये होता. त्यातील नऊ महिने तो कारागृहात होता.
जून महिन्यापासून तो पुन्हा रुग्णालयात दाखल झाला. त्याला हार्निया असल्याचे कारण दिले होते. त्याच्या या आजारावर चक्क ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता संजीव ठाकूर (Sanjeev Thakur)यांनीच उपचार केले असल्याचे पुढे आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कैद्यांच्या वार्ड १६ मध्ये डीन संजीव ठाकूर यांच्याकडूनच ललित पाटील याच्यावर उपचार केले. ससूनच्या रजिस्टरमध्ये एसटी असा कोडवर्ड वापरला आहे. एसटी म्हणजे संजीव ठाकूरच आहेत, असे धंगेकर यांनी यावेळी म्हटले. या रजिस्टरमध्ये हर्निया या आजारावर ललित पाटील याच्यावर उपचार सुरू असल्याचा उल्लेख केला आहे.
या प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी डीन संजीव ठाकूर यांना चांगलेच धारेवर धरले आहे. आरोपी ललित पाटील ९ महिने ससूनमध्ये संजीव ठाकूर यांच्या आशीर्वादामुळे राहिला. या प्रकरणातून ठाकूर यांनी मोठी संपत्ती जमवली असल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणीही आमदार धंगेकर यांनी मीडियाशी संवाद साधताना केली आहे.
संजीव ठाकूर यांनी बोगस पद्धतीने ललित पाटील (DrugMafia Lalit Patil) याच्यावर उपचार केल्याची नोंद ससूनच्या रजिस्टरमध्ये दिसत असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाकूर यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
दुसरीकडे सुषमा अंधारे यांनीदेखील ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्यावर आरोप केले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची नार्कोटिक्स चाचणी करावी. संजीव ठाकूर खोटे बोलत आहेत. हर्नियाच्या ऑपरेशनला पाच महिने कसे लागतात? संजीव ठाकूर यांच्यावर कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का? असे सवाल करून संजीव ठाकूर यांना सहआरोपी करावे, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.