Ncp News : लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या यात्रेचा 'मार्ग' बदलला!

Ncp News : एक परिपक्वतेचे राजकारण शहर राष्ट्रवादी व त्यांच्या नेत्यांनी केले आहे.
Laxman Jagtap | NCP | Sharad Pawar
Laxman Jagtap | NCP | Sharad Pawar Sarkarnama

पिंपरीः वाढलेली महागाई, बेरोजगारी, भ्रष्ट्राचार, शेतकऱ्यांमधील असंतोष, महिला सुरक्षा, भाजपच्या नेत्यांकडून महापुरुषांविषयी वारंवार केल्या जाणाऱ्या अपमानजनक वक्तव्यांविरोधात, तसेच जनजागृती करण्यासाठी प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर जनजागर यात्रा काल (दि. ०३ जाने.) पुण्यातून सुरु केली आहे. उद्या उद्योगनगरीत येणार असून, पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील नेते सामील होणार आहेत.

संपूर्ण पिंपरी-चिंचवडमधून ही यात्रा फिरणार होती. मात्र, चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे काल निधन झाल्याने त्यांच्या निवासस्थानाजवळून यात्रा जाणार नाही. यात्रेच्या मार्गात आता बदल करण्यात आला आहे. लक्ष्मण जगताप यांचा पिंपळे गुरवचा परिसर टाळून, ही यात्रा इतर मार्गानो नेऊन, एक परिपक्वतेचे राजकारण शहर राष्ट्रवादी व त्यांच्या नेत्यांनी केले आहे.

Laxman Jagtap | NCP | Sharad Pawar
Satara : 'रयत' करणार 'आयबीएम'शी करार; विद्यार्थ्यांना नोकरीची हमी : पवार

शहरात दुपारी तीन वाजता पिंपरी बाजारपेठेत डिलक्स चौकात, आकुर्डीच्या खंडोबा माळ येथे साडेचार वाजता, तर गोसावी हॉस्पीटल, रूपीनगर येथे सायंकाळी सहा वाजता या यात्रेच्या कोपरासभा सभा होणार आहेत. शहरातील यात्रेचा समारोप भाजपचे शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार यांच्या मतदारसंघात भोसरीगावात पीएमटी चौकातील सभेने रात्री आठ वाजता होणार आहे.

या मोहिमेसाठी एलईडी रथ तयार केला असून, भाषणासाठी स्वतंत्र रथ आहे. पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान, प्रदेश निरीक्षक आशा मिरगे, वैशालीताई नागवडे, शितल हगवणे यांच्यासह शहरातील पक्षाचे सर्व नेते, आजी-माजी नगरसेवक,पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे व महिला अध्यक्षाकविता आल्हाट यांनी आज दिली.

Laxman Jagtap | NCP | Sharad Pawar
Aimim : आमच्यासोबत असते तर प्रकाश आंबेडकर किंगमेकर ठरले असते..

१५ नोव्हेंबर २०२२ ला मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत यात्रा काढण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सावित्राबाई फुले जयंतीदिनी काल पुण्यातून फुले वाड्यापासून यात्रा सुरु झाली. पिंपरी-चिंचवडसह नऊ महापालिका हद्दीतून यात्रा चैत्यभूमी, दादर मुंबई येथे जाईल. दुसऱ्या टप्यात ती नागपूरच्या चैत्यभूमीपासून सुरु होऊन विदर्भातील ११ जिल्ह्यात फिरेल. मार्चमध्ये उत्तर महाराष्ट्र, एप्रिलला कोकण, मे मध्ये पुणे ग्रामीण आणि पश्चिम महाराष्ट्र, तर जूनमध्ये मराठवाड्यातील आठ जिल्हे, असा या यात्रेचा मार्ग आहे. तिचा समारोप ३० जूनला सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवशी केला जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com