Pune Girl Attack : शरद पवारांच्या हस्ते होणार लेशपाल आणि हर्षदचा सत्कार

Sharad Pawar: दोन दिवसांपूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाने एकच खळबळ उडाली होती.
Pune Girl Attack :
Pune Girl Attack :Sarkarnama
Published on
Updated on

दोन दिवसांपूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाने एकच खळबळ उडाली होती. पण या हल्ल्यात स्वत:चे प्राण धोक्यात घालून लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या तरुणांनी तरुणीचे प्राण वाचवले. या घटनेनंतर राज्यभरातून या तरुणांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते या दोघांचाही सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात उद्या त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम होणार आहे.

पुण्यातील गजबजलेल्या सदाशिव पेठेत मंगळवारी (२७ जून ) एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) (Shantanu Laxman Jadhav) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार केले. पण स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान दाखवत मोठ्या धाडसानं या विकृत हल्लेखोर तरुणाला पकडलं आणि तरुणीचा जीव वाचला. आता तरुणीचा जीव वाचवणाऱ्या तरुणांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतं. (Pune Girl Attack)

Pune Girl Attack :
Pune Girl Attack : तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी!

हा थरारक प्रसंग घडत असताना सभोवतालचे लोक बघ्याची भूमिका घेत होते. पण स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लेशपाल आणि हर्षद यांनी मोठ्या धाडसानं हल्लेखोर तरुणाला रोखलं. त्याला पेरुगेट पोलिसां(Police)च्या ताब्यातही दिलं. तरुणांच्या या धाडसामुळे एका तरुणीचा जीव वाचला. या त्यांच्या धाडसाचं सर्वत्र कौतुकाचा होऊ लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवनात दोन्ही तरुणांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर आता शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com