Pune Girl Attack : तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी!

Pune Girl Attack : दिवसाढवळ्या भर रस्त्यात पोलीस चौकीजवळच तरूणाचा कोयत्याने हल्ला...
Pune Girl Attack : तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी!
Published on
Updated on

Pune Crime News : प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला या कारणाने एका तरुणीवर दिवसाढवळ्या भर रस्त्यामध्ये पाठलाग करून कोयत्याने वार करत, तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलीसांनी अटक केल्यानंतर आता त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर बुधवारी (ता.२८) सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Latest Marathi News)

शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१, रा. डोंगरगाव, ता. मुळशी) (Shantanu Laxman Jadhav) असे कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रेमसंबंध संपवल्याच्या रागातून त्या आरोपीने मंगळवारी (ता. २७) सकाळी दहाच्या सुमारास पु्ण्यातील सदाशिव पेठेतील (Sadashiv Peth Crime Incident) पेरुगेट पोलीस चौकीजवळ (Peru Gate Police Chouwki) तरुणीचा पाठलाग करून, तिच्यावर कोयत्याने हल्ला (Koyta Attack) करीत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात मुलीच्या डोक्याला आणि हाताला जखम झाली आहे. हल्ला झालेल्या २० वर्षीय मुलीने याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात (Vishrambagh Police Satation) फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंतनू जाधववर खुनाचा प्रयत्न केल्यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Girl Attack : तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी!
Pune Girl Attack : कोयता हल्ल्यात तरुणीला वाचवणाऱ्या लेशपालची इन्स्टा स्टोरी चर्चेत; "त्या मुलीची जात कुठली?...ते मेसेज डिलिट करा!

तरुणीवर हल्ला करीत असतानाच जाधव याला लेशपाल जवळगे (Leshpal Jawalge) आणि हर्षद पाटील (Harashd Patil) या दोन तरुणांनी पकडले. त्यामुळे या हल्ल्यातून तरुणी बचावली. त्यानंतर सदाशिव पेठ घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी चोप देऊन जाधव याला पोलिसांच्या ताब्यात दिले होते. अटक केल्यानंतर जाधव याला बुधवारी सकाळी न्यायालयात हजर करण्यात आले होते. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावा, अशी मागणी सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने आरोपी जाधव याला एक जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस उपनिरीक्षक पुनम पाटील या गुन्ह्याचा तपास करीत आहोत.

आरोपीच्या रक्ताचे होणार रासायनिक विश्लेषण :

आरोपी जाधव याच्या रक्ताचा नमुना काढून तो रासायनिक विश्लेषणासाठी पाठविण्यात आला आहे. त्याचा पुढील तपासासाठी वापर होणार आहे. तर जाधव याने कोयता कोठून आणला, याबाबत त्याकडे तपास करायचा आहे. हा गुन्हा जाधव याने कोणाच्या सांगण्यावरून केला आहे का? याची देखील चौकशी करण्यात येणार आहे. त्यासाठी त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद ॲड. वर्षाराणी जाधव यांनी केला. आरोपीची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे का? याचा देखील पोलीस तपास करीत असल्याचा युक्तिवाद ॲड. जाधव यांनी केला.

Pune Girl Attack : तरुणीवर कोयत्याने वार करणाऱ्या आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी!
Nagpur Crime News : पुण्यात कोयता गॅंग तर नागपुरात ‘पिस्तुल राज’ची दहशत !

तरुणीसोबत असलेल्या मित्रानेच सोसला पहिला घाव :

जाधव याने तरुणीवर हल्ला केला तेव्हा तिच्या बरोबर असलेला तिचा मित्र तेथून पळून गेला, अशी चर्चा मंगळवारी सुरू झाली होती. मात्र तरुणीसोबत असलेल्या मित्रानेच जाधव याने केलेला पहिला वार सोसला. या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुजेट व्हायरल झाले आहे. त्यात देखील पहिल्यांदा त्या मित्रावरच हल्ला झाल्याचे दिसते. त्यानंतर जाधव याने पाठलाग करून तरुणीवर हल्ला केला. जाधव याने केलेल्या हल्ल्यात तरुणीच्या मित्राच्या डाव्या हाताला जखम झाली आहे. उपचार केल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com