Mann Ki Baat @100 : 'मन की बात’ ची पिंपरी-चिंचवडमध्ये जय्यत तयारी,ज्येष्ठांसाठी खास सोय

BJP Pimpri Chinchwad Mann ki Baat Program : ज्येष्ठांसाठी शंभरावी ‘मन की बात’पाहण्याची खास सोय केली आहे.
PM Narendra  Modi
PM Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

live broadcast of mann ki baat program bjp Pimpri Chinchwad : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या ‘ मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाच्या १०० व्या पर्वासाठी पिंपरी-चिंचवड भाजपने जय्यत तयारी केली असून ठिकठिकाणी हा कार्यक्रम ‘लाईव्ह’केला जाणार आहे.

आज (रविवार) कार्यक्रमाचे प्रसारण सकाळी ११ वाजता होणार आहे. ‘मन की बात’च्या १०० व्या भागाच्या प्रसारणानिमित्त भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे तसेच माजी नगरसेविका (प्रभाग १०अ) अनुराधा गोरखे यांनी महिलांसाठी मोफत पाककला प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले आहे.

आज सकाळी ९ ते ११ या वेळेत संभाजीनगर येथील नॉव्हेल स्कूलच्या हॉलमध्ये तो भरणार आहे. त्यात ब्राऊन ग्रेव्ही - व्हेज भूना, टोमॅटो ग्रेव्ही - पनीर बटर मसाला, व्हाईट ग्रेव्ही - मेथी मटर मलाई आणि इतर पदार्थांविषयी प्रशिक्षण दिले जाईल.

त्यासाठी महिलांनी नावनोंदणी करण्यासाठी 8446616198 व 7517505533 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. तर,याच पक्षाचे दुसरे माजी नगरसेवक (प्रभाग २७ड) चंद्रकांत नखाते यांनी रहाटणी येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात व बाहेरही फक्त ज्येष्ठांसाठी शंभरावी ‘मन की बात’पाहण्याची खास सोय केली आहे.

PM Narendra  Modi
Bazar Samiti Election : बारामती बाजार समिती पुन्हा राष्ट्रवादीकडे ; अजितदादांच्या रणनीतीमुळे भाजपचा सुपडा साफ

‘मन की बात’दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी होते.या महिन्याची ती १०० वी असल्याने तिला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. आज सकाळी ११ वाजता ती होणार आहे.

PM Narendra  Modi
Nagar Bazar Samiti Result : नगरमध्ये विखे, कर्डिलेंची जादू ; लंकेंचा डंका, तनपुरेंचे वर्चस्व अबाधित, निवडणुकीची ही आहेत वैशिष्ठ्ये..

तिचे लाईव्ह प्रसारण भाजप ही आपल्या शहरातील सर्व शक्तीकेंद्रांवर करणार आहे. त्यात सहभागी होण्यासाठी होण्यासाठी www.Mygov.inया संकेतस्थळाला भेट द्या किंवा 1800117800 नंबर डायल करा,असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.

भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रदेश पदाधिकारी, `मन की बात` चे संयोजक, सहसंयोजक, शक्तीकेंद्र प्रमुख, बूथप्रमुख आणि कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली.

यावेळी चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, विधान परिषद सदस्या उमा खापरे, मन की बात कार्यक्रमाचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक अमित गोरखे, शहर संयोजक नंदकुमार दाभाडे यांनी मार्गदर्शन केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com