Narendra Modi Rally In Pune : 'मोदी अभी जिंदा है...' भरसभेत ठणकावले

Loksabha Election : एक रात्रीत काँग्रेसने मुस्लिमांना ओबीसी घोषित करत त्यांना ओबीसीमधून आरक्षण दिले. ओबीसींच्या हक्काचे आरक्षण मुस्लिमांना दिले, असे मोदी म्हणाले.
Narendra Modi Rally In Pune
Narendra Modi Rally In Punesarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election : पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पुण्यात आज (सोमवारी) झाली. आपल्या आक्रमक भाषण शैलीने पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात मोदींनी सर्वाधिक घायळ केले काँग्रेसला. संविधान बदलणावरून मोदींना घेरणाऱ्या काँग्रेसला मोदींनी थेट आरक्षण विरोधी ठरवले. काँग्रेसने कर्नाटकामध्ये मुस्लिमांना रातोरात ओबीसीमधून आरक्षण obc Reservation दिल्याचा दावा देखील मोदींनी केला.

Narendra Modi Rally In Pune
Narendra Modi News : भटकत्या आत्म्यामुळं राज्यात अस्थिरता; PM मोदींचा नेमका रोख कुणाकडे?

' काँग्रेसने Congress मुस्लिमांना कर्नाटकामध्ये आरक्षण दिले. त्यावरून न्यायालयाने त्यांना खडसावले. तर एक रात्रीत काँग्रेसने मुस्लिमांना ओबीसी घोषित करत त्यांना ओबीसीमधून आरक्षण दिले. ओबीसींच्या हक्काचे आरक्षण मुस्लिमांना दिले. मोदी अजून जिवंत आहे .इंडी आघाडीवाल्यांनो कान उघडून ऐका. जोपर्यंत मोदी जिवंत आहे तो पर्यंत धर्माच्या आधारावर आरक्षण देऊ देणार नाही.', असे नरेंद्र मोदींनी Narendra Modi ठणकावले.

काँग्रेस नागरिकांच्या तिजोरीवर दरोडा टाकणार आहे. तुमचे सोने, संपत्ती काढून विशिष्ट समाजाला देणार आहे, असा दावा मोदींनी आपल्या भाषणात केला. काँग्रेस 60 वर्षांत मूलभूत सुविधा देऊ शकला नाही.

मनमोहन सिंग यांच्या सरकारने गेल्या 10 वर्षात मूलभूत सुविधांवर जेवढा खर्च केला तेवढा आम्ही एक वर्षात केला,असे पंतप्रधान मोदी म्हणाले. मागील दहा वर्षाच्या काळात किती बाॅम्बस्फोट होत होते. ते आता बंद झाले की नाही. आतंकवाद्यांना आता पीठही मिळत नाही. मोदी घरमे घुसके मारेगा, असे पंतप्रधानांनी पाकिस्तानचे नाव न घेता ठणकावले.

शरद पवारांना टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता गेल्या काही वर्षांपासून राज्य काही भटकत्या आत्म्यांचे शिकार झाले आहे, असा टोला लगावला. आपल्या राजकीय इच्छा पूर्ण करण्यासाठी एका व्यक्तिने 45 वर्षांपासून राज्यात अस्थिरता निर्माण केली आहे,असे देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.

Narendra Modi Rally In Pune
Narendra Modi Rally In Pune : 70 वर्षांवरील व्यक्तींना मोफत उपचार! PM मोदींच्या भाषणातील 'हे' आहेत ठळक मुद्दे

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com