Lok Sabha Election 2024 : बारामतीनंतर अजितदादांची चाल शिरूरकडे; कोल्हेंना हरवण्यासाठी जोरदार फिल्डिंग...

Ajit Pawar Vs Amol Kolhe : शिरुरमध्ये आता दोन्ही पवारांकडून सभांचा धडाका लावण्यात येणार आहे.
Lok Sabha Election 2024
Lok Sabha Election 2024Sarkarnama

Pune News : राज्यातील हायप्रोफाईल, सर्वाधिक चर्चेची आणि पवार विरुद्ध पवार अशी लढत असलेली बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघावर लक्ष वळवले आहे. शिरूरमध्ये आता दोन्ही पवारांकडून सभांचा धडाका लावण्यात येणार आहे. (Latest Marathi News)

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्यासाठी अजितदादांनी एकाच दिवसात चार ठिकाणी जाहीर सभा लावण्यात आलेल्या आहेत. तर दुसरीकडे शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हेंसाठी शरद पवारांची (Sharad Pawar) एक जाहीर सभा उद्या (9 मे) होणार आहे. त्यामुळे लोकसभेच्या चौथ्या टप्प्यातही पवार विरुद्ध पवार अशी प्रचार लढाई दिसून येणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lok Sabha Election 2024
Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार गट आक्रमक; अजित पवार गटाविरोधात गंभीर तक्रारी, कुठं काय घडलं?
Lok Sabha Election 2024
Rajendra Gavit In BJP : एकनाथ शिंदेंना धीरे से मगर जोर का झटका; खासदार गावित भाजपमध्ये दाखल!

शिरूरमधून अमोल कोल्हे (Amol Kolhe) विरुद्ध आढळराव पाटील अशी थेट लढत होत असली तरी हा मतदारसंघ पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र पक्ष फुटीनंतर राजकीय समीकरणं बदलल्याने कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील, अशी होत असली तरी शिरूरमध्ये खरी लढाई दोन्ही पवारांमध्येच रंगणार आहे. याची सुरुवात उद्यापासूनच पाहायला मिळणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com