बारामती लोकसभा मतदारसंघात ( Baramati Lok Sabha Election 2024 ) महायुतीमधील शिवसेना नेते, विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात बंड पुकारलं आहे. रविवारी शिवतारेंनी अजित पवारांवर ( Ajit Pawar ) टीका करताना विंचवाची उपमा दिली होती. हे विधान राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे. त्यानंतर आता अजित पवार गटातील नेत्यानं थेट महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे.
बारामती मतदारसंघातून माघार न घेण्यावर शिवतारे ( Vijay Shivtare ) ठाम आहेत. त्याच पार्श्वभूमीवर 12 एप्रिलला 12 वाजता बारामती मतदारसंघातून अर्ज दाखल करत बारा वाजवण्याचा निर्धार शिवतारेंनी केला आहे. त्यामुळे बारामतीची लढत सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यातच रविवारी ( 25 मार्च ) शिवतारेंनी अजित पवारांना लक्ष्य केलं होतं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवतारे नेमकं काय म्हणाले?
"हा ( अजित पवार ) विंचू अनेकांना डसला असून, मोदीरूपी महादेवाच्या पिंडीवर जाऊन बसला आहे. चप्पल मारावी तर महादेवालासुद्धा लागते आणि विंचवालाही मारता येत नाही. फक्त विंचूरूपी अजित पवार ( Ajit pawar ) नाही, तर दोन्ही शक्तींचा बिमोड आपल्याला करावा लागणार आहे. मी माझं सर्वस्व अर्पण करून या लढाईत उतरलो आहे. फकीर म्हणून मी माझं आयुष्य महाराष्ट्र आणि देशासाठी समर्पित करेन," असं शिवतारेंनी म्हटलं.
"आम्ही लाचार झालो नाही"
यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी शिवतारेंचा ( Umesh Patil On Vijay Shivtare ) समाचार घेतला आहे. "शिवतारेंनी खालच्या स्तरावर जाऊन चप्पल मारण्याची भाषा करणं, विंचू हे शब्द वापरणं, एवढं ऐकून घेण्याइतपत आम्ही लाचार झालो नाही. शिवतारे हे शिवसेना नेते आणि महायुतीतील घटक आहेत. शिवतारेंची हकालपट्टी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यापूर्वीच आम्ही केली आहे," असं पाटील म्हणाले.
"आमच्या नेत्यावर खालच्या स्तरावर टीका"
"महायुतीतील खासदाराला अडचण निर्माण करण्याचं काम शिवतारेंकडून केलं जात आहे. तसेच, आमच्या नेत्यावर खालच्या स्तरावर ते टीका करत आहेत. त्यामुळे महायुतीत राहायचं का नाही, याचा विचार आम्हाला करावा लागेल," असा इशारा उमेश पाटलांनी दिला आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.