Ajit Pawar News : "पूर्वी आम्ही घास-घास घासायचो, श्रेय मिळत नव्हतं, आता इकडं अदानी, अंबानीही ओळखतात"

Ajit Pawar On Suntra Pawar : "पंधरा वर्षांतील कारकिर्दीपेक्षा सुनेत्रा पवार यांची कारकीर्द जास्त उजवी असेल, हे मी करून दाखवीन," असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama
Published on
Updated on

Baramati News : देशात लोकसभा निवडणुकीचा ( Lok Sabh Election 2024 ) रणसंग्राम सुरू आहे. दुसरीकडे बारामतीतील लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार कुटुंबात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच काका, पुतण्या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांच्या प्रचाराचा नारळ बारामतीतील कण्हेरी येथे मारूती मंदिराजवळ फोडून करण्यात शुक्रवारी ( 19 एप्रिल ) आला. त्यानंतर सुनेत्रा पवार ( Sunetra pawar ) यांच्याही प्रचाराचा शनिवारी ( 20 एप्रिल ) नारळ मारुती मंदिरात फोडून करण्यात आला. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी तुफान फटकेबाजी केली.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) यांच्याशिवाय देशाचा कारभार करेल, असा दुसरा नेता समोर नाही. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी ( Rahul Gandhi ) यांच्यात तुलना होऊ शकत नाही. दहा वर्षे विरोध करण्यात गेली. पुढील पाच वर्षांतसुद्धा विरोधात, गेली तर आपली कामे होणार नाहीत. त्यासाठी महायुतीच्या विचाराचा खासदार संसदेत पाठवणे गरजेचे आहे. कुणी रडतील, डोळ्यांत पाणी आणतील, पण भावनिक होऊ नका," असा टोला अजित पवारांनी ( Ajit Pawar ) सुप्रिया सुळेंना ( Supriya Sule ) लगावला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"वडिलांना निवडून दिलं, 1991 मध्ये मला आणि तीनदा मुलीला निवडून दिलं; एकदा सुनेला निवडून द्या, असं बोलल्यावर काहींना वाईट वाटलं. पण, यात माझं काय चुकलं? पंधरा वर्षांतील कारकिर्दीपेक्षा सुनेत्रा पवार यांची कारकीर्द जास्त उजवी असेल, हे मी करून दाखवीन," असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला.

Ajit Pawar
Ajit Pawar On Rohit Pawar : साहेबांचाच रोहितला विरोध होता; अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट, नेमकं काय झालं होतं?

"महायुतीत सामील झाल्यानं नरेंद्र मोदी, अदानी आणि अंबानीबरोबर ओळख झाली आहे. पूर्वी आमच्या ओळखीच नसायच्या. आम्ही नुसतं घास, घास घासायचो. मोठी लोक यायची, यांनी केलं, यांनी केलं म्हणायची आणि जायची. पण, राबणारा तसाच राहायचा. मात्र, आता आमच्या ओळखी होत असून, त्याचा उपयोग राज्य आणि जिल्ह्यालाच करून देत आहे," असं अजित पवारांनी म्हटलं.

"मला बारामतीसारखा पुरंदर, दौड, इंदापूर, भोर, वेल्हे, मुळशी, खडकवासल्याच्या भागाचा विकास करायचा आहे. खूपजण म्हणतात यांना बारामतीशिवाय काय दिसतच नाही. मी अनेक भागांना निधी देतो. समाजाचं काम करताना सर्वांना बरोबर घेऊन जावं लागतं," असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

R

Ajit Pawar
Ajit Pawar News : अजित पवारांनी इंदापुरात केलेल्या 'त्या' वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल; कारवाई होणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com