Pune News : लोकसभा निवडणुकीचा चौथ्या टप्प्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. उद्या (13 मे) रोजी मतदान पार पडणार आहे. दरम्यान या शिरुर लोकसभा मतदारसंघातील एका सभेत अजित पवारांनी खासदार अमोल कोल्हे यांना जाहीर मंचावरुन अमोल कोल्हेला पाडूनच दाखवतो, असा जाहीर इशारा दिला. आता उपमुख्यमंत्री यांच्या याच विधानाचा आता अमोल कोल्हेंनी जबरदस्त समाचार घेतला आहे. (Lok Sabha Election 2024)
शेवटच्या प्रचारसभेत (11 मे) अमोल कोल्हे म्हणाले, "अजितदादा म्हणतात अमोल कोल्हे पाडूनच दाखवतो. मला खरंच प्रश्न पडतो. मी जर तत्व आणि स्वाभिमान गहान टाकून मोदींची तळी उचलून धरणाऱ्या तुमच्या महायुतीच्या बाजूने सामील झालो असतो तर तुम्ही हेच बोललं असतं का?"
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"दादा (Ajit Pawar) तुम्ही म्हणता ना अमोल कोल्हेला पाडून दाखवतो. खडा सवाल आहे आमचा. या शेतकऱ्याच्या मुलाला पाडायला दोन दोन उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राज्यातली सत्ता देशातली सत्ता लावावी लागत असेल तर माझ्याकडे पवार साहेबांचा आशीर्वाद आणि मायबाप जनता आहे, असेही कोल्हे म्हणाले.
कोल्हे पुढे म्हणाले, " दादा काय चुकलं हो आमचं? का आव्हान देताय येऊन? आमचा काका मामा राजकारणात नाही, हे माझं चुकलं? तत्त्वांच्या बाजूने उभं राहणं हे माझं चुकलं? साडे एकोणीस हजार कोटींचा निधी मतदारसंघात आणलं, हे माझं चुकलं? की आम्ही तत्त्वाच्या, निष्ठेच्या बाजूला उभे राहिलो आणि स्वार्थासाठी स्वाभिमान गहाण टाकलं नाही, हे माझं चुकलं?"
"मला पाडणार असा दम देणाऱ्या दादांना सांगतो, "साधं मांजराला सुद्धा कोंडून मारण्याचा प्रयत्न केला ना, तर प्रतिहल्ला करतं, मी तर शिवसिंहाची औलाद आहे थांबणार नाही. आता तर प्रचारसभा संपल्यानंतर अजून विधानसभा बाकी आहे. करारा जवाब मिलेगा. आतापर्यंत आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, जेव्हा कफन बांधलेला बंडखोर अमोल कोल्हे बघाल तेव्हा फक्त त्याची तयारी ठेवा, एवढंच सांगतो, असं आव्हानही अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिले.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.