Shirur Lok Sabha Election 2024 : शिरुर लोकसभेच्या निकालात 'भोसरी'ची निर्णायक भूमिका; काय आहे विजयाचं गणित?

Lok Sabha Election 2024 : "या शहरी भागात यावेळीही सर्वाधिक मतदान अधिक होईल, असा अंदाज आहे.जे गतवेळसारखे निर्णायक ठरणार आहे."
Shirur Lok Sabha Election 2024
Shirur Lok Sabha Election 2024Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिरुर (जि.पुणे) लोकसभेत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचे उमेदवार यावेळी रिंगणात असल्याने या मतदारसंघाच्या निकालाकडे साऱ्या राज्याचे लक्ष याकडे लागले आहे. दरम्यान, आपणच विजयी होऊ, असा दावा दोन्ही पवारांच्या उमेदवारांनी केला आहे. मात्र, कोणाच्याही गळ्यात विजयाची माळ पडली, तरी त्यात निर्णायकी भूमिका भोसरी विधानसभा मतदारसंघ बजावणार आहे. (Latest Marathi News)

भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिरुरमध्ये सर्वाधिक मोठा आहे. गतवेळी 2019 ला शिरुरमधील इतर पाच विधानसभा मतदारसंघापेक्षा जास्त मतदान भोसरीत झाले होते. तसेच तेथील मताधिक्यही शिरुरमध्ये सर्वाधिक होते. तो पिंपरी-चिंचवडमधील तीनपैकी एक विधानसभेचा मतदारसंघ आहे. त्यामुळे या शहरी भागात यावेळीही सर्वाधिक मतदान अधिक होईल, असा अंदाज आहे.जे गतवेळसारखे निर्णायक ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shirur Lok Sabha Election 2024
Shivajirao Adhalrao Patil : शिवाजी आढळराव पाटलांची संपत्ती किती?

भोसरीवर दोन्ही प्रमुख उमेदवारांनी (महायुतीचे शिवाजीराव आढळराव-पाटील आणि आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे) यावेळी अधिक लक्ष्य केंद्रित केले आहे. त्यातून ते वरचेवर भोसरीचे प्रचार दौरे सध्या करीत आहेत. आढळरावांनी, तर भोसरीची पूर्ण जबाबदारी आपल्या चिरंजीवांनाच देऊन टाकली आहे. ते भोसरीत तळ ठोकून आहेत.

Shirur Lok Sabha Election 2024
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?

भोसरीने 2019 ला शिरुरमध्ये (Shirur) सर्वाधिक म्हणजे 37 हजाराचे मताधिक्य दिले होते. यावेळी ते एक लाख करण्याचा निश्चय स्थानिक भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी बोलून दाखवला. लांडगे यांच्याकडे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे. भोसरीवर त्यांचा पूर्ण होल्ड आहे.

Shirur Lok Sabha Election 2024
Amol Kolhe News :... तर महाराष्ट्राने तुम्हाला का साथ द्यावी; डॉ. अमोल कोल्हेंचा महायुतीच्या नेत्यांना थेट सवाल

मतदारसंघावर प्रभावी पकड असल्यामुळे 2014 ला मोदी लाटेतही ते अपक्ष म्हणून भोसरीतून आमदार (Mahesh Landge) म्हणून निवडून आले होते. त्यामुळे ते 2024 च्या लोकसभेला किंगमेकरची भूमिका बजावणार आहेत. महायुतीला मोठा जनाधार असल्यामुळे लाखाचे लीड शक्य आहे, असे ते म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com