Maval Lok Sabha Constituency : एक वाघेरे बाद तर दुसरा मागे घेणार; ठाकरेंच्या संजोग वाघेरेंचं टेन्शन कमी होणार?

Shrirang Barne Vs Sanjogh Waghere : मावळ विधानसभेला आतापर्यंत कुणाचीही आमदारकीला हॅटट्रिक झालेली नाही, तशी ती खासदारकीचीही झालेली नाही. ही संधी यावेळी बारणेंना आहे. तर, ती चुकविण्याचा चान्स वाघेरेंना चालून आलेला आहे.
Sanjogh Waghere, Shrirang Barne
Sanjogh Waghere, Shrirang BarneSarkarnama

Maval Political News : मावळ लोकसभेची यावेळीची निवडणूक दोन्ही शिवसेनेतच होणार असल्याने लक्षवेधी ठऱत आहे. शिंदे शिवसेनेचे (महायुती) उमेदवार श्रीरंग बारणे हे खासदारकीच्या हॅटट्रिकवर आहेत. तर, मावळात आतापर्यंत न झालेली खासदारकीची हॅटट्रिक चुकविण्याचा निर्धार ठाकरे शिवसेनेचे संजोग वाघेरे-पाटील यांनी केला आहे.

गेल्यावेळी मावळमध्ये स्थानिक (बारणे) विरुद्ध बाहेरचा (बारामतीचे पार्थ पवार) अशी लढत झाली होती. तिच्या निकालाने विक्रम झाला. कारण पवार कुटुंबातील पहिला पराभव तेथे झाला. त्यातील विजेते बारणे यावेळी दुसरा रेकॉर्ड करण्याच्या बेतात आहेत. मावळ विधानसभेला आतापर्यंत कुणाचीही आमदारकीला हॅटट्रिक झालेली नाही, तशी ती खासदारकीचीही झालेली नाही. ही संधी यावेळी बारणेंना आहे. तर, ती चुकविण्याचा चान्स वाघेरेंना चालून आलेला आहे. त्यात कोण बाजी मारते, हे ४ जूनला कळणार आहे.

हॅटट्रिकसाठी बारणे जोमाने कामाला लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्य प्रतिस्पर्धी वाघेरेंची मते खाण्यासाठी व त्यातून त्यांचा पराभव करण्याकरिता नामसाधर्म्य असलेले इतर दोन वाघेरे उमेदवार उभे करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यातील एक (संजय वाघेरे) हे नाशिकचे आहेत. तर, दुसरे उरणचे (संजोग पाटील) आहेत. संजोग पाटील यांची उमेदवारी दाखल करताना शिंदे शिवसेनेचा एक पदाधकारी हजर होता. त्यातून त्यांना अपक्ष म्हणून उभे करण्यात शिंदे शिवसेनेचा हातभार असल्याच्या झालेल्या आरोपाला दुजोरा मिळाला आहे.

Sanjogh Waghere, Shrirang Barne
Ranjeetsinha Naik-Nimbalkar : निंबाळकरांनी 50 वर्षांची हिस्ट्रीच काढली; धैर्यशील अन् रणजितसिंह मोहिते-पाटलांवर वार

दरम्यान, या दोन अपक्ष वाघेरेंमुळे ठाकरेंचा मावळा (संजोग वाघेरे) काहीसा अडचणीत आला होता. मात्र, अर्ज छाननीत एका अपक्ष वाघेरेचा पत्ता कट झाला आणि तेथे ठाकरेंच्या वाघेरेंचे टेन्शन निम्मे कमी झाले. स्वतःचे नाव असलेल्या मतदार यादीची मूळ प्रमाणित प्रत सादर न केल्याने अपक्ष उमेदवार संजय वाघेरेंचा अर्ज बाद झाला. मात्र,उरणचे संजोग पाटील यांचा तो वैध ठरल्याने ठाकरेंच्या वाघेरेंना निम्मे टेन्शन अद्याप आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ते दूर करण्याचे कसोशीने प्रयत्न सुरु झाले आहेत. उद्या (ता.२९) दुपारी तीन वाजता माघारीची मुदत संपणार आहे. काल, आज शनिवार, रविवारच्या सलग दोन दिवसांच्या सुट्टीमुळे परवाच्या (ता. २६) अर्ज छाननीनंतर एक सुद्धा अर्ज आजपर्यंत (ता.२८) मागे घेण्यात आलेला नाही.आता उद्या शेवटच्या किती अर्ज मागे घेतले जातात, यापेक्षा संजोग पाटील माघार घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sanjogh Waghere, Shrirang Barne
Uddhav Thackeray : 'एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी!; ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com