Ashok Pawar News : विजय शिवतारे करण्याची अजितदादांकडून दमबाजी अन् अशोकबापूंनी सुनावलं

Ajit Pawar Vs Ashok Pawar : 'मंत्री काय आमदार कसा होतो,' असं चॅलेंज अजितदादांनी अशोक पवारांना दिलं आहे. या चॅलेंजनंतर संतापलेल्या अशोक पवारांनी अजित पवारांना चोख भाषेत उत्तर दिलं आहे.
ajit pawar | Ashok Pawar
ajit pawar | Ashok Pawarsarkarnama

Pune News, 10 May : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत पाठोपाठ शिरूर मतदारसंघात ( Shirur Lok Sabha Constituency ) आढळराव यांना निवडून आणण्यासाठी मोठी ताकद लावली आहे. आढळराव जिंकण्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या साथीला असलेल्या अमोल कोल्हे यांना धडा शिकवण्याची अजित पवार यांची रणनीती आहे. या संघर्षात कोल्हेंसाठी पायाला भिंगरी लावून फिरणाऱ्या पवारांना बघून घेण्याची भाषा केली आहे.

'मंत्री काय आमदार कसा होतो,' असं चॅलेंज अजितदादांनी ( Ajit Pawar ) अशोक पवारांना ( Ashok Pawar ) दिलं आहे. या चॅलेंजनंतर संतापलेल्या अशोक पवारांनी अजित पवारांना चोख भाषेत उत्तर दिलं आहे. 'पाडायचं का नाही, हे जनतेच्या हातात आहे. ज्याच्या कपाळावर लिहिलंय, हे कुणी पुसू शकत नाही,' असं अशोक पवारांनी म्हटलं. यानंतर अजितदादा आणि अशोकबापू यांच्यातील शाब्दिक संघर्ष पेटणार हे नक्की.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अशोक पवार म्हणाले, "अजितदादा मोठे नेते आहेत. मी फार छोटा कार्यकर्ता आहे. मला दमदाटी करण्यापेक्षा अजितदादांनी कांद्याला, दुधाला चांगला भाव द्यावा. आमची औकात काढून काय मिळणार. मी शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा माणूस आहे. मी शरद पवार यांच्याबरोबर गेल्यानं दादा या थराला जातील हे योग्य आहे का? हे जनता ठरवेल."

"घोडगंगा कारखान्यानं कर्ज घेतलं, ते सगळं भरलं. नंतर आम्हाला नवीन कर्ज मिळणार होते. सरकारनं सहा कारखान्यांना थकहमी दिली. आम्हालाही मिळेल, अशी अपेक्षा होती. जून-जुलै महिन्यात कारखान्याचा एक रूपया थकीत नव्हता. मग आमचं कर्ज का अडवलं? कर्जसाठी खूप प्रयत्न केले. पण, राजकीय बदल आणि शरद पवार यांच्याबरोबर असल्यानं कर्जाबाबत अडवणूक झाली का?" असा सवाल अशोक पवार यांनी उपस्थित केला.

"शरद पवार यांना मी माझ्या वडिलांच्या जागी मानतो. मला मंत्रीपद सोडा, आमदारकीचं तिकीट नाही मिळालं, तरी चालेल. मला शरद पवार यांच्याबरोबर राहायचं आहे," असं अशोक पवार यांनी म्हटलं.

पुण्यातील सर्व आमदारांनी अजितदादांना पाठिंबा दिला. विकासाच्या मुद्द्यावरून तुम्ही का अजितदादांकडे गेला नाही? या प्रश्नावर अशोक पवार म्हणाले, "विकास महत्वाचा आहे. पण, निष्ठा सोडायची नाही. कॉलेज जीवनापासून मी शरद पवार यांच्यावर प्रेम करणार कार्यकर्ता आहे. मग, माझ्या निष्ठेवर बाधा का आणू. सरकार बदलल्यानंतर मला ऑफर दिली जातील. मात्र, मला ते मान्य नाही. मला जनतेनं घरी बसवलं, तरी मला दु:ख नाही. शरद पवार सांगतील तो निर्णय मला मान्य आहे."

ajit pawar | Ashok Pawar
Ajit Pawar Shirur Sabha : ‘घोडगंगा’वरून अजितदादांचा अशोक पवारांवर हल्लाबोल; ‘तुझ्या अंगात नाही दम, तू काय माझं नाव घेतो...’

"मी सामान्य माणसाशी जोडलेला आहे. शरद पवार आणि जनता ठरवेल अशोक पवारांना आमदार करायचं की नाही. मी अजितदादांच्या विधानाला फार महत्वं देत नाही. असा दम देणं माझ्या दृष्टीनं सामान्य वाटतं. एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही दम देता, हे कशाचं द्योतक आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अजितदादांनी दमदाटीची भाषा करू नये," अशा शब्दांत अशोक पवार यांनी सुनावलं आहे.

विजय शिवतारे यांना अजितदादांनी ठरवून पाडलं होतं, या प्रश्नावर अशोक पवार म्हणाले, "पाडायचं का नाही, हे जनतेच्या हातात आहे. कुणी बोललं म्हणून पडत नाही. ज्याच्या कपाळावर लिहिलंय, ते कुणी पुसू शकत नाही."

ajit pawar | Ashok Pawar
Ajit Pawar : ‘गेली ३५ वर्षांत ह्या अजित पवारला कोणी पोच मागितली नाही; हा गडी मला पोच मागतोय’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com