Ajit Pawar On Chandrakant Patil : ...त्यानंतर चंद्रकांतदादांनी अवाक्षरही काढलं नाही; अजितदादांनी घेतला समाचार!

Lok Sabha Election 2024 : "पण निवडणुकीला शरद पवार साहेब उभेच नव्हते, तर त्यांचा पराभवाचा प्रश्न येतोच कुठे? मात्र त्यांनी असं विधान करणे, हे चूक आहे. हे मी मान्य करतो. त्यांनी असं बोलायला नको होतं."
Ajit Pawar On Chandrakant Patil
Ajit Pawar On Chandrakant Patilsarkarnama

Pune News : भारतीय जनता पार्टीचे नेते व राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी बारामतीत शरद पवारांचा पराभव हे माझे उद्दीष्ट आहे, अशा प्रकारचं विधान केले होते. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्याचा जोरदार समाचार घेतला आहे. चंद्रकांतदादांनी असं विधान करायला नको होते, ते पूर्णत: चुकीचं विधान होतं, असं अजित पवार म्हणाले. बारामतीनंतर अजित पवार यांनी मिशन शिरूर मनावर घेतले आहे. त्यानिमित्ताने सातत्याने शिरूर मतदारसंघामध्ये सभा घेत असून यासाठी ते पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

(Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामतीत शरद पवारांचा पराभव हे माझं उद्दीष्ट आहे आणि याचा वचपा काढायची संधी मला आणि भाजपच्या प्रत्येक कार्यकत्याकडे चालून आली आहे, असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी खरपूस समाचार घेतला.

Ajit Pawar On Chandrakant Patil
Ajit Pawar Vs Rohit Pawar : रोहित पवारांचे लहानपण काढत अजितदादांचा पलटवार; म्हणाले...

अजित पवार म्हणाले, "चंद्रकांत पाटलांनी केलेल्या विधानाला काही अर्थ नव्हता. यानंतर आम्ही चंद्रकांत पाटलांना म्हणालो, दादा तुम्ही आपलं पुण्यातचं बघा. बारामतीत काय असेल ते आमचे कार्यकर्ते बघतील. त्यांनी तसं विधान करायला नको होतं. पण ते का बोलून गेले आम्हाला माहिती नाही. मात्र पुन्हा त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही. पण निवडणुकीला शरद पवार साहेब उभेच नव्हते, तर त्यांचा पराभवाचा प्रश्न येतोच कुठे? मात्र त्यांनी असं विधान करणे, हे चूक आहे. हे मी मान्य करतो. त्यांनी असं बोलायला नको होतं."

Ajit Pawar On Chandrakant Patil
Shivsena Vs BJP: प्रसाद लाड यांनी ठाकरेंना डिवचलं; म्हणाले, उद्धव यांची गत 'उंदीर गेला लुटी...'
Ajit Pawar On Chandrakant Patil
Ajit Pawar Vs Nilesh Lanke : शरद पवारांना उद्देशून अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर नीलेश लंकेंची प्रतिक्रिया, म्हणाले...

काय म्हणाले होत चंद्रकांत पाटील ?

अजित पवार काय म्हणाले व काय झाले यापेक्षाही महाराष्ट्रात 2019 मध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) शिवसेनेला बाहेर काढून राज्याला फसविले. नरेंद्र मोदी यांचीही त्यांनी फसवणूक केली. आज आम्हाला शरद पवार यांचा हिशेब चुकता करण्याची संधी मिळाली आहे. मला व माझ्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा पराभव करायचा, इतनाही काफी है... बाकी गोष्टी आमच्यासाठी गौण आहेत, असे म्हणत चंद्रकांत पाटलांनी यंदा पवारांचा पराभव पक्का आहे, अशी टीकाही केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com