Supriya Sule News : जय माझ्या मुलासारखा! सुप्रिया सुळेंकडून जय पवारांच्या टीकेला उत्तर

Jay Pawar News : बारामतीमध्ये घडलेल्या एका घटनेचा दाखला देताना सुप्रिया सुळे यांना मीडियाचा गैरवापर कसा करायचा, हे चांगलं माहिती आहे, असा टोला जय यांनी लगावला होता.
Jay Pawar, Supriya Sule
Jay Pawar, Supriya SuleSarkarnama

Pune News :  लोकसभा मतदारसंघांमध्ये आता दुसऱ्या टप्प्यातील प्रचार सुरू आहे. बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात असून, त्यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार आणि जय पावर हे दोन्ही पुत्र रिंगणात उतरले आहे. जय पवार हे भोरमध्ये तर पार्थ पवार हे खडकवासला मतदारसंघातील प्रचारात व्यस्त आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule News) आणि सुनेत्रा पवार यांच्या लढत होत आहे.

जय पवार (Jay Pawar) हे सोमवारी भोर तालुक्यातील गाव दौऱ्यावर असताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. बारामती (Baramati) मध्ये घडलेल्या एका घटनेचा दाखला देताना सुप्रिया सुळे यांना मीडियाचा गैरवापर कसा करायचा, हे चांगलं माहिती आहे, असा टोला जय यांनी लगावला होता. (Lok Sabha Election 2024)

Jay Pawar, Supriya Sule
Parth Pawar Y Plus security : उपमुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना 'वाय प्लस' सिक्युरिटी !

काल बारामतीमध्ये जैन समाजाच्या कार्यक्रमादरम्यान सुप्रियाताई आणि मी एकत्र आलो. तेव्हा मी त्यांना बोललो, आत्या तुम्ही पहिला नारळ ठेवा तर त्या म्हणाल्या, नाही जय तू आधी ठेव. मग मी नारळ ठेवून त्या ठिकाणी डोळे मिटून प्रार्थना करत होतो. त्याच वेळेस माझ्या शेजारी बारामती शहराचे अध्यक्ष जय पाटील येऊन उभे राहिले, असे जय पवारांनी काल सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मी प्रार्थना करत असताना सुप्रियाताई म्हणाल्या, काय जय कसं चाललंय? मला वाटलं, त्या मला म्हणाल्या. म्हणून मी डोळे उघडून त्यांना बोललो आता सगळं बर आहे. मग त्या मला म्हणल्या, मी तुला नाही मी दुसऱ्या जयशी बोलत होते, असा खुलासा जय पवार यांनी केला होता.

सुप्रियाताईंनी ते सर्व व्हिडिओ पत्रकारांना दिले आणि सुप्रिया सुळे यांनी जय पवारची विचारपूस केली, अशी खोटी बातमी त्यांना करायला लावली. हे खोटं बोलून त्यांना काय मिळतंय? असा सवाल जय पवारांनी उपस्थित केला होता.

Jay Pawar, Supriya Sule
Kolhe Vs Aadhalrao: हिंमत असेल तर या; कोल्हेंचे आढळरावांना खुलं चॅलेंज

सुप्रिया सुळे यांनी जय पवारांच्या या विधानावर आज प्रतिक्रिया दिली आहे. सुळे म्हणाल्या, जय हा माझ्यापेक्षा खूप लहान आहे. माझ्या मुलासारखा आहे. त्यामुळे मुलं जेव्हा काही बोलतात, तेव्हा मी माझ्या घरातल्या लहान मुलांबद्दल कधीच काही बोलणार नाही.

पार्थ पवार (Parth Pawar) यांना पुरवण्यात आलेल्या वाय प्लस सुरक्षेविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमच्या मुलांना अशा प्रकारची सुरक्षा दिली नाही. ठीक आहे. मुलांवर प्रेम करणं, काही चुकीचं नाही. लोकशाहीमध्ये इतका तर हक्क बनतोच, असं सुळे म्हणाल्या.

R

Jay Pawar, Supriya Sule
Lok Sabha Election 2024 : बारामतीत आणखी एका 'तुतारी'ची एन्ट्री; शरद पवारांच्या पक्षाची आयोगाकडे धाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com